Covid-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: PTI)

पाकिस्तान (Pakistan) मध्ये चीन निर्मित कोरोना लस सिनोफार्मा (Sinopharm Vaccine) याचा वापर 60 वर्षावरील व्यक्तींसाठी केला जाणार नसल्याचे पंतप्रधान इमरान खान यांच्या विशेष सचिव डॉक्टर फैसल सुल्तान यांनी म्हटले आहे. कारण ही लस 60 वर्षावरील व्यक्तींना देण्यासाठी परवानगी मिळालेली नसल्याचे सुल्तान यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी पत्रकारांशी बातचीत करताना असे म्हटले आहे की, सरकारच्या एक्सपर्ट कमेटीने याच्या आकड्यांचे विश्लेषण केले असता त्यात असे दिसून आले आहे की, ही लस फक्त 18-60 वयोगटातील व्यक्तींसाठीच आहे.

सुल्तान यांनी पुढे असे ही म्हटले की, कोरोनाची परिस्थिती ही सामान्य नाही आहे. त्यामुळे नवी लस पाकिस्तानला जेव्हा मिळेल त्यानंतर त्यावर विश्लेषणाच्या आधारावर निर्णय घेतला जाईल. तर 60 वर्षावरील व्यक्तींना एस्ट्राजेनेका लस दिली जाईल असे सुल्तान यांनी म्हटले आहे.(Serum Institute 100 देशांना करणार कोरोना लसीचा पुरवठा; UNICEF सोबत केला करार)

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानातात चीनची सिनोफार्मा लस पोहचली आहे. त्यासाठी पाकिस्तानने चीनकडे 5 लाख लसीचे डोस मागवून घेतले होते. सरकारच्या मते त्यांना ही लस चीन कडून मोफत दिली गेली आहे. त्यानंतर आता पाकिस्तानात लसीकरण अभियान सुरु झाले आहे. सुरुवातीला आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना कोरोनावरील ही लस दिली जाणार आहे.(China: ऐकावे ते नवलच! नाक आणि घशासोबतच Anal Swabs घेऊन होत आहे कोरोना विषाणूची चाचणी; देशातील तज्ञांनी केले कौतुक)

दरम्यान, अशाच पद्धतीचा निर्णय जर्मनीच्या ऑक्सफर्ड आणि एस्ट्राजेनेका यांनी  कोरोना व्हायरस बद्दल घेतला होता. येथे सुद्धा कोरोना व्हायरस वरील लस 65 वर्षावरील अधिक वय असणाऱ्यांना दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. विशेषज्ञांनी मात्र यावर नाराजी व्यक्त करत तो योग्य निर्णय नसल्याचे म्हटले आहे.  पाकिस्तानने सुद्धा हाच प्रश्न उपस्थितीत केला आहे. तर 60 वर्षावरील  लोकांना एस्ट्राजेनेका ही लस देण्याबद्दल फैसल यांनी असे म्हटले की, काही देशांनी याला विरोध केला आहे. पण काही देशांनी त्यासाठी परवानगी दिली आहे.