Facebook Ban Russian State Media: मेटा कंपनीचा मोठा हल्ला, आता रशियन मीडिया कंपनी फेसबुकवर अॅड करू शकणार नाही
Facebook | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

युक्रेनमध्ये (Ukraine) रशियन बॉम्बहल्ल्याने सर्वत्र घबराट पसरली आहे. लोक गोंधळात इकडे-तिकडे धावत आहेत, परंतु कोणत्याही पाश्चात्य देशांची लष्करी मदत थेट युक्रेनपर्यंत पोहोचत नाही. रशियावर लष्करी कारवाईशिवाय पाश्चात्य देश सर्व प्रकारचे निर्बंध जाहीर करण्यात गुंतले आहेत. काल अमेरिका, (America), ब्रिटनसह (Britain) अनेक देशांनी रशियावर आर्थिक निर्बंधांची घोषणा केली होती आणि आता अमेरिकन कंपन्याही या निर्बंधांना पुढे करत आहेत. फेसबुकने (Facebook) रशियन सरकारी मालकीच्या रशियन मीडियावर फेसबुकच्या माध्यमातून जाहिरात करण्यावर आणि प्लॅटफॉर्मचा वापर करून कोणत्याही स्वरूपात पैसे कमविण्यावर (Facebook Ban Russian State Media) बंदी घातली आहे. रशियाने फेसबुकवर मर्यादित प्रवेश केल्यानंतर फेसबुकने प्रत्युत्तर म्हणून हे पाऊल उचलले आहे.

फेसबुकने रशियन मीडियावर बंदी घातल्यानंतर काल रशियाने आपल्या देशातील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अंशतः मर्यादित केले. फेसबुकच्या सुरक्षा धोरणाचे प्रमुख नॅथॅनियल ग्लेचर यांनी ट्विट केले की, "आम्ही फेसबुकवरील कोणत्याही पैशाच्या स्रोतातून रशियन सरकारी मालकीचे माध्यम बंद केले आहे. रशियन मीडिया यापुढे फेसबुकच्या माध्यमातून जाहिरात करू शकणार नाही.

Tweet

नॅथॅनियल ग्लेचर यांनी म्हटले आहे की आम्ही रशियन मीडियाला अतिरिक्त मार्गांनी लेबल करणे सुरू ठेवू. हा बदल Facebook मध्ये आधीच सुरू झाला आहे आणि आम्ही तो वीकेंडपर्यंत सुरू ठेवू. नॅथॅनियल ग्लेचर यांनी पुढच्या ट्विटमध्ये लिहिले की, आम्ही सातत्याने युक्रेनच्या संकटावर लक्ष ठेवून आहोत आणि त्यावर गांभीर्याने लक्ष ठेवत आहोत. आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर लोकांच्या सुरक्षेसाठी कोणती पावले उचलणार आहोत याची माहिती देत ​​राहू. खरे तर फेसबुकची कंपनी मेटा रशियन मीडियाला खोट्या बातम्यांचे लेबल लावण्यासाठी अमेरिकेच्या दबावाखाली आहे. (हे ही वाचा Russia-Ukraine Crisis: युक्रेनमधील कीव येथील रहिवाशी इमातीवर क्षेपणस्र हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल, पहा अंगावर काटा येणारे दृष्य (Watch Video)

रशियन मीडिया दबावाखाली

दुसरीकडे रशियानेही देशांतर्गत माध्यमांवर दबाव वाढवला आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार, युक्रेनच्या आक्रमणाबाबत कोणत्याही प्रकारची खोटी बातमी दिल्यास बंदी घालण्याची धमकी देण्यात आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरने असेही म्हटले आहे की त्यांनी युक्रेन संकटानंतर दिशाभूल करणारी माहिती परावृत्त करण्यासाठी सुरक्षा आणि अखंडता टीम सक्रिय केली आहे. यापूर्वी फेसबुकने युक्रेनवरील हल्ल्यानंतर रिअल टाइममध्ये स्पेशल ऑपरेशन सेंटर तयार केल्याचे सांगितले होते. तज्ञांची एक टीम तैनात करण्यात आली आहे ज्यात स्थानिक लोकांना देखील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि वास्तविक वेळेत सुरक्षा मानकांचे पालन करण्यासाठी ठेवण्यात आले आहे.