युक्रेन आणि रशियामध्ये युद्धाची ठिकणी पेटली असून दोन्ही देश एकमेकांवर आक्रमण थांबवण्याचे नावच घेत नाही आहे. तर दुसऱ्या बाजूला रशियाला युक्रेनमध्ये घुसखोरी करुन तेथे आपले वर्चस्व स्थापित करायच्या दृष्टीने सातत्याने तेथे बॉम्ब हल्ले, क्षेपणस्राच्या माध्यमातून हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच दोन्ही देश आम्ही एकमेकांचे किती जवान मारले याचे ही दावे करत आहेत. अशातच सध्या सोशल मीडियात युक्रेन मधील कीव येथील रहिवाशी इमारतीवर रशियाकडून करण्यात आलेल्या क्षेपणस्र हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या सुद्धा अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

Watch Video: 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)