Drone Attack In Russia: रशियातील कझान येथे ड्रोनचा वापर करून 9/11 सारखा हल्ला करण्यात आला आहे. राजधानी मॉस्कोपासून 720 किलोमीटर अंतरावर असलेल्या कझानमध्ये एका उंच इमारतीला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये एक ड्रोन इमारतीला धडकताना दिसत आहे. युक्रेनने हा हल्ला घडवून आणल्याचं बोलण्यात येत आहे. दुसरीकडे, युक्रेनविरुद्ध लढण्यासाठी रशियाला पाठवलेल्या उत्तर कोरियाच्या सैन्याने युक्रेनियन ड्रोन शोधण्यासाठी अधिक देखरेख चौक्या उभारल्या आहेत.

कोणतीही जीवितहानी नाही -

TASS नुसार, आपत्कालीन सेवा घटनांच्या ठिकाणी पोहोचल्या. बाधित इमारतीतून रहिवाशांना बाहेर काढले जात असले तरी अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. फेब्रुवारी 2022 मध्ये रशिया-युक्रेन संघर्ष सुरू झाल्यानंतर, युक्रेनियन ड्रोन रशियाची राजधानी मॉस्को तसेच इतर रशियन प्रदेशांवर अनेक वेळा रोखले गेले आहेत.

कझान येथे 9/11 सारखा ड्रोन हल्ला, पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)