PM Modi, Volodymyr Zelensky (PC - ANI)

PM Narendra Modi Ukraine Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुढील महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये युक्रेनला भेट (Ukraine Visit) देणार आहेत. 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर पंतप्रधानांची ही पहिलीच भेट असेल. तेथे ते राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांची भेट घेणार आहेत. याआधी पंतप्रधान मोदी आणि झेलेन्स्की यांची इटलीमध्ये झालेल्या G7 शिखर परिषदेत भेट झाली होती. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी एकमेकांची गळाभेट घेऊन स्वागत केले.

झेलेन्स्की यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल मोदींचे अभिनंदनही केले होते. 23 ऑगस्टला मोदी युक्रेनच्या दौऱ्यावर जाऊ शकतात, असा अंदाज बांधला जात आहे. (हेही वाचा -Volodymyr Zelensky Car Accident: युक्रेनचे पंतप्रधान झेलेन्स्की यांच्या वाहनाला अपघात; कोणतीही गंभीर दुखापत नाही)

दरम्यान, सप्टेंबर 2022 मध्ये उझबेक शहर समरकंदमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत झालेल्या द्विपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, आजचा काळ युद्धाचा काळ नाही. रशियन नेत्याने युक्रेन संघर्ष संपवला पाहिजे. त्यांच्या संदेशाला जागतिक नेत्यांकडूनही प्रशंसा मिळाली. (हेही वाचा - Rishi Sunak: युक्रेन रशिया युध्दात नवा ट्विस्ट, यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा युक्रेन दौरा करत राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींची घेतली भेट!)

पंतप्रधान म्हणाले होते की, भारत कोणत्याही शांतता प्रयत्नांमध्ये योगदान देण्यास तयार आहे. केवळ संवाद आणि मुत्सद्देगिरीने युद्ध सोडवले जाऊ शकते. रशियामध्ये, पंतप्रधान मोदींना दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी पुतिन यांच्याकडून रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान, ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टलने सन्मानित करण्यात आले. 22 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी पुतिन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 जुलै 2024 पासून दोन दिवसांच्या मॉस्को दौऱ्यासाठी गेले होते.