Maldives Ex-President Apologized: बहिष्कारानंतर मालदीवची अवस्था बिकट; माजी अध्यक्ष Mohamed Nasheed यांनी मागितली माफी, म्हणाले, 'भारतीय जनतेने आम्हाला माफ करावे'
Maldives Former president Mohamed Nasheed (PC - Facebook)

Maldives Ex-President Apologized: भारतातील लोकांनी बहिष्कार टाकल्यानंतर मालदीव (Maldives) ची स्थिती बिकट झाली आहे. आता मालदीवला आपली चूक समजली आहे. मालदीवचे माजी अध्यक्ष मोहम्मद नशीद (Mohamed Nasheed) यांनी मालदीववर बहिष्कार टाकण्याच्या भारताच्या आवाहनाच्या परिणामाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. माजी राष्ट्रपतींनी भारतीयांची माफी मागितली आहे. भारत दौऱ्यावर आलेल्या नशीद यांनी मालदीवच्या लोकांच्या वतीने माफी मागितली आणि भारतीय पर्यटकांनी देशाला भेट देत राहण्याची इच्छा व्यक्त केली.

दरम्यान, मोहम्मद नशीद यांनी भारताने मालदीववर बहिष्कार टाकण्याच्या आवाहनाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. याचा परिणाम आपल्या देशातील पर्यटन क्षेत्रावर झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. दोन्ही देशांमधील तणावाबाबत त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि मालदीवच्या लोकांना ‘माफ करा’ असे म्हटले. (वाचा - Maldives Association of Tourism Industry On PM Modi: मालदीव्ह टुरिझम बॉडी कडून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरूद्ध आक्षेपार्ह विधानाचा निषेध!)

प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, मालदीववर बहिष्काराचा खूप मोठा परिणाम झाला आहे. मला त्याबद्दल खरोखरच काळजी वाटते. मला आणि मालदीवच्या लोकांना माफ करा. मला वाटते की या प्रकरणांचे निराकरण केले पाहिजे. यासाठी आपण बरेच बदल केले पाहिजे आणि आपल्या सामान्य नातेसंबंधात परत जोपासले पाहिजेत. न्यूज एजन्सी एएनआयच्या वृत्तानुसार, माजी राष्ट्रपतींनी मीडियाला सांगितले की, मी माझ्या सुट्टीच्या दिवशी मालदीवमध्ये येईन आणि आमच्या पाहुणचारात कोणताही बदल होणार नाही.

माजी राष्ट्रपतींनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. यासंदर्भात बोलताना मोहम्मद नशीद म्हणाले की, मी काल रात्री पंतप्रधानांची भेट घेतली. पीएम मोदींनी आम्हा सर्वांना शुभेच्छा दिल्या. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा समर्थक असून मी त्यांना शुभेच्छा देतो. (हेही वाचा - India-Maldives Row: पंतप्रधान मोदींचा अवमान, 'केसरी टूर्स' कडून मालदीवच्या सहली रद्द)

डॉर्नियर उड्डाण आणि हेलिकॉप्टरच्या अलीकडील चर्चेबद्दल बोलताना, नशीद यांनी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू यांना अशा प्रकारच्या चर्चा थांबवण्याची विनंती केली. नशीद यांनी भारत आणि मालदीव यांच्यातील चिरस्थायी मैत्री देखील अधोरेखित केली, ज्याचे मूळ गरजेच्या वेळी परस्पर मदत आणि सहकार्यामध्ये आहे.