पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भारताबाबत मालदीवच्या (Maldives) मंत्र्यांनी अवमानकारक टिप्पणी केल्याने देशभरात संतापाची लाट पसरली आहे. यानंतर सोशल मिडियावर #BoycottMaldives सह ट्विट करणे सुरू झाले आहे. विविध क्षेत्रातील अनेक लोकांनी मालदीवच्या मंत्र्यांच्या टिपण्णीबाबत निषेध नोंदवला आहे. या वादानंतर EaseMyTrip ने मालदीवसाठीचे सर्व फ्लाइट बुकिंग रद्द केले आहे. इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सने (Indian Chamber Of Commerce) मालदीववर बहिष्कार टाकण्याचे आणि देशांतर्गत पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे. यानंतर ‘केसरी टूर्स’ने (Kesari Tours) मालदीवच्या सर्व पर्यटन सहली रद्द केल्या आहेत. (हेही वाचा - #BoycotMaldives Trend: इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे मालदीववर बहिष्कार टाकण्याचे आवाहन; EaseMyTrip कडून मालदीवसाठी सर्व फ्लाइट बुकिंग रद्द)
याबाबत केसरी टूर्स कंपनीच्या संचालक झेलम चौबळ यांनी सांगितले की, ‘मालदीव हा भारताचा जुना मित्र असून, पर्यटनाच्या बाबतीत हा देश बव्हंशी भारतावर अवलंबून आहे. मात्र, त्यांनी राष्ट्र म्हणून भारताचा आणि आपल्या पंतप्रधानांचा केलेला अपमान कदापि सहन करणार नाही. एक वर्ष मालदीवच्या पर्यटनाला न गेल्याने भारतीय पर्यटकांना काहीही फरक पडणार नाही.