WhatsApp ने  एका महिन्यात 20 लाखांहून अधिक भारतीय युजर्सचे केले बंद अकाउंट्स, जाणून घ्या कारण
WhatsApp | Representation Image (Photo Credits: Pixabay)

सोशल मीडियात खोट्या आणि बनावट बातम्यांमुळे शांतता भंग होत असल्याने आता अॅप अलर्ट झाले आहेत. त्यासाठी सातत्याने कठोर पावले उचलली जात आहेत. याच दरम्यान, फेसबुकचे मालकी हक्क असलेल्या व्हॉट्सअॅपने (WhatsApp) ऑक्टोंबर महिन्यात 20 लाखांहून अकाउंट्स बंद केले आहेत. यामागे काही कारणे सुद्धा आहेत.(Twitter Safety Policy: युजर्सच्या संमतीशिवाय त्यांच्या खाजगी प्रतिमा किंवा व्हिडिओ शेअर करण्यावर बंदी; ट्विटरने आणले नवीन सुरक्षा धोरण)

व्हॉट्सअॅपने नव्या आयटी नियमाचे पालन करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार व्हॉट्सअॅपला सब्सक्राइबर्सकडून 500 तक्रारी आल्या आहेत. व्हॉट्सअॅपने एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, ऑक्टोंबर महिन्यात प्लॅटफॉर्मवरील 2,069,000 भारतीय खात्यांवर बंदी घातली आहे. व्हॉट्सअॅपचे असे म्हणणे आहे की, भारतीय युजर्सच्या खात्याची ओळख ही +91 फोन क्रमांकाच्या माध्यमातून केली जाते.(Popular Password in India: भारतातील सर्वात लोकप्रीय पासवर्ड आहे '123456', तुमचाही असेल तर लगेच बदला, नव्या संशोधना पुढे आली धक्कादाक माहिती)

रिपोर्टमध्ये असे सांगितले गेले आहे की, व्हॉट्सअॅप End-to-End Encrypted Messaging Service चा गैरवापर थांबवण्याच्या इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक पुढे आहे. कंपनीने सातत्याने आर्टिफिशियल इंटेलिजेंस मध्ये गुंतवणूक केली आहे. त्याचसोबत कंपनीने दुसऱ्या आर्ट टेक्नॉलॉजी, डेटा साइंटिस्ट्स आणि एक्सपर्ट्समध्ये ही गुंतवणूक केली आहे. युजर्सला पूर्णपणे सुरक्षितता देणे हे मुख्य उद्दिष्ट असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

आता तुम्ही व्हॉट्सअॅपद्वारे डीमॅट खाते उघडू शकता आणि व्हॉट्सअॅपच्या डीमॅट खात्यातून आयपीओमध्येही गुंतवणूक करू शकता. इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म अपस्टॉक्सने ही सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी गुंतवणूकदार व्हॉट्सअॅप चॅट विंडोद्वारे आयपीओसाठी अर्ज करू शकतात.