मोबाईल, लॅपटॉप, एटीएम कार्ड असो किंवा इतर कोणतेही डिवाईस अथवा मेल आयडी असो. या सर्व उपकरणांचे अनेकांचे पासवर्ड ठरलेले असतात. भारताही असाच एक पासवर्ड (Most Popular Password in India) आहे. जो अतिशय सोपा आणि म्हणूनच लोकप्रिय आहे. हा पासवर्ड म्हणजे '123456' होय. हा पासवर्ड (Password ) इतका प्रचलित आहे की, कोणीही व्यक्ती हा पासवर्ड सहज हॅक (Password Hacker) करु शकते. कोणाच्याही हाताला हा पासवर्ड सहज लागू शकतो. त्यामुळे सायबर गुन्ह्यासारख्या (Cyber Crime) घटना घडण्याच्या शक्यता अधिक वाढतात. त्यामुळे तुमचाही पासवर्ड असाच असेल तर तो ताबडतोबत बदला.
विशेष असे की, '123456' हा सोपा पासवर्ड वापरण्यात भारताईतकेच जपानी लोकही अग्रेसर आहेत. होय, नुकत्याच झालेल्या संशोधनात आढळून आले की, भारतीय नागरिकांप्रमाणेच जपान देशातील अनेक लोक '123456' हा पासवर्ड वापरतात. (हेही वाचा, Tips For Strong Password: 'या' 8 टिप्ससह सेट करा स्ट्राँग पासवर्ड!)
भारतात प्रचीलत असलेले इतर काही पासवर्ड
भारतात '123456' प्रमाणेच इतरही काही पासवर्ड प्रसिद्ध आहेत. यात आय लव्ह यू (Iloveyou), कृष्ण (Krishna), साईराम (Sairam) ओमश्रीराम (0msairam) असे पासवर्ड वापरतात. NordPass ने केलेल्या नव्या संशोधनानुसार, काही भावनिक शब्द, देवांची नावे आणि क्रमवाचक संख्या पासवर्ड म्हणून ठेवण्यास भारतातील लोक प्राधान्य देतात. अनेक लोक व्यक्ती, नातलगांची नावे, भावनिक शब्द ठेवण्याचे प्रमाण इतर देशांमध्येही सर्वसाधारण सारखेच आहे. तसेच हे प्रमाण स्त्री आणि पुरुष अशा दोघांमध्येही आढळते. भारतात अनेक लोक 123456789, 12345678, india123, qwerty, abc123, xxx, Indya123, 1qaz@WSX, 123123, abcd1234 and 1qaz या पासवर्डचा वापर करतात.
भारतीय लोकांमध्ये इतर देशांच्या तुलनेत एकसारखा पासवर्ड ठेवण्याचे प्रमाण मोठे आहे. जवळपास 43 देशांमध्ये अनेक लोक पासवर्ड म्हणून 'password' हाच शब्द ठवतात तर जवळपास 50 देशांतील लोक पासवर्ड म्हणून '123456' या अक्षरे किंवा संख्येची निवड करतात.
काही लोक आपल्या आवडत्या लोकांची नावे पासवर्ड म्हणून ठेवतात. जसे की, "प्रियांका", "संजय", "राकेश" आणि इतर.इंग्रजीतील प्रेम व्यक्त करणारे शब्द देखील सामान्य आहेत, विशेषतः स्त्रियांमध्ये, उदाहरणार्थ "iloveyou", "स्वीटहार्ट", "लव्हली", "सनशाईन" आणि इतरही काही शब्द वापरतात.
संशोधनाने हे देखील स्पष्ट केले आहे की टॉप पासवर्ड किती कमकुवत आहेत. हे पासवर्ड हेच दर्शवितात की पासवर्ड क्रॅक करण्यासाठी हॅकरला किती वेळ लागेल. एकंदरीत, भारतात 200 पैकी 62 पासवर्ड एका सेकंदापेक्षा कमी वेळात क्रॅक होऊ शकतात. हे प्रमाण 31 टक्के आहे, तर जागतिक स्तरावर ही टक्केवारी 84.5 टक्के आहे. "दुर्दैवाने, पासवर्ड कमकुवत होत चालले आहेत आणि लोक अजूनही ते योग्यपणे सांभाळत नाहीत. NordPass चे CEO जोनास कार्क्लिस म्हणतात. "पासवर्ड हे आमच्या डिजिटल जीवनाचे प्रवेशद्वार आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे आणि आम्ही अधिकाधिक वेळ ऑनलाइन घालवल्यामुळे, आमच्या सायबरसुरक्षेची अधिक चांगली काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे होत आहे.