Representational Image | (Photo Credits: PTI)

Unbreakable Passwords Tips:  डिजिटल तंत्रज्ञानाचे फायदे आणि नुकसान दोन्ही आहेत.  ईमेल, बँक अकाऊंट डिटेल्स, खाजगी डेटा मिळवण्यासाठी  हॅकर्स वेगवेगळ्या पद्धती शोधून काढतात आणि त्याद्वारे फ्रॉड घडवून आणतात. त्यामुळे पासवर्ड स्ट्रॉंग असणे गरजेचे आहे. साधारणपणे पासवर्ड लक्षात ठेवण्यासाठी नाव, बर्थ डेट, मोबाईल नंबर, अॅनिव्हर्सरी डेट यांचा वापर केला जातो. असे पासवर्ड्स हॅकर्स अगदी सहज शोधून काढतात. ज्यामुळे सायबर हल्ल्याची शक्यता अधिक वाढते. त्यामुळे स्ट्राँग पासवर्ड असणे गरजेचे आहे.

स्ट्राँग पासवर्ड सेट करण्यासाठी भारतीय स्टेट बँकेने आठ टिप्स सांगितल्या आहेत. त्यामुळे सायबर गुन्हे कमी होण्यासही मदत होईल. दरम्यान, सध्याच्या काळात सायबर गुन्हांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी भारत सरकारने संरक्षण मंत्रालयाची सायबर एजेंसी पूर्णपणे कार्यरत आहे. (Most Dangerous Passwords: 'हे' आहेत जगातील सर्वात धोकादायक पासवर्ड; लगेच सावध व्हा, अन्यथा तुमच्या अकाऊंटमधील सर्व पैसे होतील गायब)

स्ट्राँग पासवर्ड सेट करण्याच्या 8 पद्धती:

# अपरकेस आणि लोअरकेस अक्षरं मिळवून पासवर्ड तयार करा. उदा.- aBjsE7uG

# पासवर्डमध्ये नंबर्स आणि Symbols दोन्हींचा वापर करा. उदा.- AbjsE7uG61!@

# सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कमीत कमी 8 वर्णांचा पासवर्ड सेट करा. उदा.- aBjsE7uG

# कोणत्याही सामान्य शब्दांचा (Common Dictionary Words) वापर करणे टाळा. उदा.- itislocked किंवा thisismypassword

# "qwerty" किंवा "asdfg" यांसारख्या किबोर्ड पॅटर्नचा वापर करणे टाळा. याऐवजी आपल्या  किबोर्डवरुन इमोटिकॉन्स (उदा.- :), :/) च्या मदतीने स्ट्राँग पासवर्ड तयार करा.

#12345678 किंवा abcdefg यांसारखे पासवर्ड कधीच ठेऊ नका.

# DOORBELL - DOOR8377 यांसारखे सहज गेस करता येणारे substitutions पासवर्ड म्हणून सेट करु नका.

# पासवर्ड शक्यतो मोठा ठेवावा.

# नाव, जन्मतारीख असा पासवर्ड शक्यतो नसावा- उदा.- रमेश@1967

या गोष्टींची अधिक काळजी घ्या:

जन्मतारीख, वेडिंग अनिव्हर्सरी डेट यांचा पासवर्डमध्ये समावेश करु नका. असे पासवर्ड पटकन ब्रेक करता येतात. त्याचबरोबर मुलांचे नाव, जन्मतारीख, पाळीव प्राण्यांचे नाव पासवर्ड म्हणून वापरु नका.

कोविड-19 संकट सुरु झाल्यापासून जुलै 2021 पर्यंत पाच हजारहून अधिक फिशिंग वेबसाईट्स समोर आल्या आहेत. तर मागील आठवड्यात आलेल्या रिपोर्टनुसार युजर्सचे अकाऊंट डिझाईन करण्यासाठी भारतातील सुमारे 73 कंपन्याांचा डेटा पुढील 12 महिन्यांमध्ये लीक होण्याची शक्यता आहे.