Most Dangerous Passwords: 'हे' आहेत जगातील सर्वात धोकादायक पासवर्ड; लगेच सावध व्हा, अन्यथा तुमच्या अकाऊंटमधील सर्व पैसे होतील गायब
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Pixabay)

आजच्या युगात प्रत्येकजण बॅकिंगपासून सोशल मीडिया (Social Media) अकाऊंट सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्डचा (Passwords) वापर करतो. आपण पासवर्ड बनवताना अशा शब्दांचे किंवा अंकाचा वापर करतो, जे पटकन उघडता येईल. परंतु, सोपा पासवर्ड ठेवणे कधीही धोकादायक ठरू शकते. कारण, या पासवर्डचा उपयोग वर्तमान काळात होऊ लागला आहे, याबद्दल प्रत्येकाला माहिती आहे. याच पासवर्ड संदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे. ज्यामुळे भविष्यात उद्भवणाऱ्या धोक्याला आपल्याला टाळता येऊ शकतो.

ब्रिटेनच्या नॅशनल सायबर सेक्युरिटी सेंटरच्या अहवालात दहा पासवर्डचा समावेश आहे, जे गेल्या एक वर्षात सर्वात अधिक वापरले गेले आहे. अहवालात असेही सांगितले आहे की, मजबूत पासवर्ड लक्षात ठेवणे कठीण असते. यामुळे जगभरातील अनेक लोक सोपा पासवर्ड ठेवणे पसंत करतात. परंतु, सुरेक्षाच्या बाबतीत हे चांगले नाही. कोणत्याही व्यक्तीने सोपा पासवर्ड ठेवला नाही पाहिजेत, ज्यामुळे भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो. यूकेच्या नॅशनल सायबर सिक्युरिटी सेंटरचे तांत्रिक संचालक डॉ. इयान लेव्ही म्हणतात की बहुतेक लोकांसाठी सायबर सुरक्षा ही एक कठीण काम आहे. बर्‍याच वेळा सोपा पासवर्ड वापरणे खूप धोकादायक ठरते. हे देखील वाचा- भारतीय भाषा शिकून घेण्याच्या ॲपसाठी MyGov कडून Innovation Challenge; 27 मे पर्यंत करू शकता अर्ज

सर्वात अधिक वापरले जाणारे 10 पासवर्ड-

123456

123456789

qwerty

password

111111

12345678

abc123

1234567

passwordi

12345

सध्या सायबर गुन्हेगारीतही मोठी वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे. यामुळे सायबर गुन्हेगारीपासून सावध राहण्यासाठी सरकारकडून वारंवार जनजागृती केली जात आहे. तसेच कोणत्याही चुकीच्या माहितीला बळी पडू नका, असेही आवाहन देखील केले जात आहे.