TAGG Liberty Buds Pro (Photo Credits-Twitter)

TAGG कंपनीने आपले नवे TWS ईअरबड्स TAGG Liberty Buds Pro लॉन्च केले आहेत. हे इअरबड्स ग्राहकांना अॅमेझॉनच्या माध्यमातून खरेदी करता येणार आहेत. याची किंमत 1199 रुपये आहे. यामध्ये नॉइस कॅन्सिलेशनसह क्वाड माइक, 3 इन बिल्ट इक्वलाइजर सेटिंग्स म्हणजेच गेमिंग मोड, बासएक्स मोड आणि बॅलेंस्ड मोड, फास्ट चार्जिंग, IPX5 रेटिंगची सुविधा मिळणार आहे.

TAGG Liberty Buds Pro अॅमेझॉनच इंडियावर प्री-रिपब्लिक डे सेलदरम्यान 1199 रुपयांना खरेदी करता येणार आहेत. टू वायरलेस इअरबड्स दोन डुअल टोन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. मॅट ब्लॅक, पियानो व्हाइट रंगात ते तुम्हाला खरेदी करता येणार आहेत. या इअरबड्समध्ये ब्लूटूथ 5.1, बॅकग्राउंड नॉइज कॅन्सिलेशनसह 4 माइक दिले आहेत. जे कॉलच्या दरम्यान क्लियर क्वॉलिटीचे वॉइस प्रोड्युस होणार आहे.(Tecno Pova Neo स्मार्टफोन लॉन्च, युजरला मिळणार 6000mAh च्या बॅटरीसह 'हे' धमाकेदार फिचर्स)

कंपनीचे हे इअरबड्स एक सुपरलाइट TWS अशून जे शानदार कटिंग एज टेक्नॉलॉजीसह येणार आहेत. इंस्टेंट ऑटो-पेयरिंग व्यतिरिक्त इअरबड्स ३ इन-बिल्ट इक्वलाइजर देणार आहेत. जे ३ टॅपमध्ये बदलता येऊ शकतात. जसे अल्ट्रा-लो लेटेंसी गेमिंग, पंची बासएक्स मोड, वॅलेंस्ड मोड आणि वोकल्स. Liberty Buds Pro च्या माध्यमातून ग्राहकांना सहजपणे फोन उचलता किंवा कट करता येणार आहे. त्याचसोबत यासाठी 30 तासांचा प्लेटाइम मिळणार आहे. फास्ट चार्जिंगसाठी टाइप सी-इअरबड्स 5 मिनिटांच्या चार्जिंगसह 75 मिनिटांचा प्लेबॅक देते.