उद्योगपती जेफ बेजोस (Jeff Bezos) यांचे आंतराळ पर्यटनाचे (Space Tourism) स्वप्न पुन्हा एकदा असफल ठरले. जेफ बोजेस यांची कंपनी ब्लू ऑरिजन ( Blue Origin Rocket Crashes) द्वारा आंतराळात प्रक्षेपीत करण्यात आलेल्या रॉकेटला सोमवारी अपघात झाला. त्यामुळे अवकाश पर्यटन पुन्हा एकदा धोक्यात आले. दरम्यान, आंतराळात पाठविण्यात आलेल्या रॉकेटमध्ये कोणीही आंतराळ प्रवासी नव्हता. हे रॉकेट केवळ वैज्ञानिक संशोधन इतक्याच माफक हेतूने पाठविण्यात आले होते. त्यामुळे अर्थातच कोणती जीवित हानी झाली नाही. परंतू, हे रॉकेट क्रॅश झाल्याने अनेकांच्या आंतराळ पर्यटन स्वप्नाच्या मात्र ठिकऱ्या उडाल्या आहेत.
वैज्ञानिक संशोधनासाठी पाठविण्यात आलेले हे रॉकेट पश्चिम टेक्सास येथून आंतराळात प्रक्षेपीत करण्यात आले होते. रॉकेट अवकाशाच्या दिशेने निघाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच त्याच्या इंजिनामध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाली. ज्यामुळे इंजिनच्या चहुबाजूंनी लाल, पिवळ्या रंगाच्या आगीच्या ज्वाळा पाहायला मिळाल्या. त्यानंतर तातडीने रॉकेटची आपत्कालीन प्रणाली कार्यान्वित झाली. आणि रॉकेट अवघ्या काही मनिटांमध्येच जमीनीवर आले. (हेही वाचा, Mercury Retrograde 2022: जाणून घ्या बुधाची वक्री म्हणजे नेमकं काय? कधी होणार सुरू आणि काय आहे संदर्भ)
ट्विट
Uncrewed Blue Origin rocket crashes shortly after liftoff from Texas.
The capsule carrying research payloads escaped and floated safely back to Earthhttps://t.co/kFYCnID6OS pic.twitter.com/Peem4HdRpB
— AFP News Agency (@AFP) September 13, 2022
ट्विट
During today’s flight, the capsule escape system successfully separated the capsule from the booster. The booster impacted the ground. There are no reported injuries; all personnel have been accounted for.
— Blue Origin (@blueorigin) September 12, 2022
अमेरिकेच्या फेडरल एविएशन एडमिनिस्ट्रेशन (Federal Aviation Administration) सांगितले की, आंतराळाच्या दिशेने झेपावलेले रॉकेट समस्या निर्माण झाल्याने पुन्हा जमीनिच्या दिशेने वळे आणि कोसळले. या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. त्यांनी म्हटले की, हे रॉकेट केवळ एक वैज्ञानिक प्रयोग होता. त्यासाठीच ते आंतराळात पाठविण्यात आले होते. अशा प्रकारचे रॉकेट लोकांना आंतराळात 10 मीनिटांची यात्रा करण्यासाठी वापरले जाते. या संस्थेने म्हटले आहे की, घटनेची पूर्ण चौकशी होऊन निष्कर्ष येत नाहीत तोपर्यंत यापुढे अशा प्रकारच्या कोणत्याच रॉकेटचे प्रक्षेपण होणार नाही.