Mercury Retrograde 2022: जाणून घ्या बुधाची वक्री म्हणजे नेमकं काय? कधी होणार सुरू आणि काय आहे संदर्भ
बुध वक्री

Mercury Retrograde 2022 Start & End Date: आकाशगंगेमध्ये प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळी रास बदलत असतो. तसेच तो कधी सरळ चालतो तर कधी उलट चालतो. ग्रहांच्या उलट हालचालींना वक्री गती म्हटलं जातं. यामुळे काही राशींवर अनुकूल-प्रतिकूल परिणाम दिसून येतात अशी मान्यता आहे. बुधाची वक्री गती 9 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान बुधाची वक्र गती (Mercury Retrograde)  राहणार आहे.

वैज्ञानिक दृष्ट्या पाहता, बुधाची वक्री गती हा एक प्रकारचा भ्रम आहे. जेव्हा सर्वात लहान ग्रह आपल्या कक्षेत पृथ्वीला घेरतो तेव्हा ग्रह उलट फिरत असल्याचा भास होतो पण प्रत्यक्षामध्ये तसे काहीच नसते. बुध हा सूर्याच्या सर्वात जवळ असणारा ग्रह आहे. तो अधिक वेगाने फिरत असतो. बुधाला सूर्य भोवती फिरण्यासाठी 88 दिवस लागतो. हाच वेळ पृथ्वी साठी 365 दिवसांचा आहे. म्हणजे दरवर्षी तो 3-4 वेळेस मागे टाकतो.

सर्वसामान्यांच्या धारणेनुसार, बुधाची मागची गती ही दळणवळण आणि वाहतूक नियंत्रित करते. दोन डोमेनमधील प्रत्येक गोष्टीवर नकारात्मक परिणाम करते. हरवलेले ईमेल, अपघात, कामाच्या ठिकाणी निर्णय घेण्याच्या निवडीवरील चुकीचा परिणाम, ऑटोमोबाईल अपघात, प्रवास करताना आव्हाने यासाठी विश्वास ठेवणारे खगोलीय घटनेला दोष देतात. काही वेळा, लोकांना बुध प्रतिगामी कालावधीत महत्वाचे व्यवसाय करण्यास थांबण्याचा इशारा देखील दिला जातो. नक्की वाचा: Geomagnetic Storm Hits Earth: पृथ्वीवर आदळू शकते भूचुंबकीय वादळ; जाणून घ्या काय आहे जिओमॅग्नेटिक स्टॉर्म आणि त्याचे परिणाम .

पृथ्वीप्रमाणे बुध देखील विकसित होत असतो, बदल होत असतो, शिफ्ट होत असतो, ट्रान्सफॉर्म होत असतो. बुधाच्या वक्रगती सोबत अनेक गैरसमजही जोडलेले आहेत. यानिमित्ताने आपणही दक्ष राहण्यास शिकतो. प्रत्येक गोष्टी दोनदा तपासून बघितल्या जातात. नकळत आपल्याकडून संयम पाळला जातो. लोकांशी जुळवून घेतले जाते.

(टीप: सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहण्यात आला आहे. लेटेस्टली कोणत्याही गोष्टीची पुष्टी करत नाही.)