'विकी डोनर्स' सावधान! आता स्पर्म डोनेट केल्यास तुमची ओळख लपून राहणार नाही
आता विकी डोनर्सची ओळख पटणार (Archived, edited, representative image)

टेस्ट ट्यूब बेबी, सोरोगसी यासारख्या अचाट प्रयोगांनतर मानवी शरीराशी संबंधीत संशोधनात आणखी एक महत्त्वपूर्ण शोध लागला आहे. यापुढे कोणत्याही व्यक्तिला त्याच्या बायोलॉजिकल वडिलांबाबत माहिती मिळू शकते. त्यामुळे आता कोणत्याच स्पर्मदात्याची (विकी डोनर) ओळख गुप्त राहणार नाही. अमेरिकेत राहणाऱ्या रायन क्रेमर याला केवळ एक cheek swab टेस्ट करायची होती. तब्बल ९ तास चाललेल्या या जीनियोलॉजिकल संशोधनानंतर त्याला आपल्या बायोलॉजिकल वडिलांची ओळख पटली आहे. रायनच्या बायोलॉजिकल वडिलांनी जेव्हा आपले स्पर्म डोनेट केले असतील तेव्हा कदाचित त्यांनी विचारही केला नसेल की, त्यांची ओळख इतक्या सहज उघड होऊ शकेल. विशेष असे की, बायोलॉजिकल वडिलांनी स्वत:ही कधी त्यांची DNA टेस्ट केली नव्हती. रायनच्या पण, असे घडले आहे. विशिष्ट टेस्टनंतर अशी कोणत्याही स्पर्मदात्याची ओळख पटवता येऊ शकते, असा दावा करण्यात येतो आहे.

ही घटना २००५मधील आहे. जेव्हा क्रेमर केवळ १५ वर्षांचा होता आणि कन्ज्यूमर DNA टेस्टची नुकतीच सुरुवात झाली होती. पण काळ इतका बदलला आहे की, आता १३ वर्षांनंतर असे व्यक्तिगत DNA टेस्ट किंट मार्केटमध्ये थोड्याशा प्रयत्नानंतर सहज उपलब्ध होऊ लागले आहेत. या किटमध्ये आता त्या लोकांसाठी चांगली संधी आहे ज्यांचा जन्म स्पर्म किंवा एग्ज डोनेटमधून झाला आहे आणि त्यांना आपल्या बायोलॉजिकल आई-वडिलांचा शोध घ्यायचा आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सध्या जगभरातील बरेच लोक या तंत्रज्ञानाचा वापर करु लागले आहेत. DNA डिटेक्टिव्सचे संस्थापक आणि जेनेटिक जीनियोलॉजिस्ट सी सी मूरे सांगतात 'काही काळापूर्वी असे स्पर्म किंवा एग्ज डोनेट करणाऱ्या व्यक्तिची ओळख गुप्त राहिल अशी खात्री (गॅरेंटी) दिली जात होती. मात्र, आता काळ खूपच बदलला आहे.'

पुढे बोलताना मूरे सांगतात, जर कोणा व्यक्तिला वाटत असेल की, आपण स्पर्म डोनेट केल्यावर आपली ओळख लपून राहिल. तर, ते किमान यूएसमध्ये तरी शक्य नाही. आता काळ बराच बदलला आहे. जर कोणी डोनरने, कन्ज्यूमर एन्सेस्ट्री साईटवर आपला DNA भलेही पाठवला नसेल. तरीसुद्धा 'जेनेटिक प्रॉक्सिमिटी' त्याची ओळख होऊ शकते. कारण, त्याच्या दूरच्या एखाद्या नात्यातील व्यक्तिनेही कधीतर DNA टेस्ट केलेली असते. आतापर्यंत केवळ एकट्या अमेरिकेतच सुमारे १ कोटीहून अधिक लोकांनी DNA टेस्ट केलेली आहे. आता तर पुढे शक्य आहे, देशातील सर्व नागरिकांची ओळख ऑनलाईन रजिस्टर्ड प्रोफाईलच्या माध्यमातून एकमेकांसोबत कुठे ना कुठे जोडलेली मिळू शकते. (हेही वाचा, भिलवडी: कृत्रिम रेतनातून म्हैशीला रेडकू; जगातील पहिलाच प्रयोग)

ज्या साईटने रायनला क्रेमरचे DNA किट पाठवले होते त्याच्या डेटाबेसमद्ये असे दोन लोक उपस्थित होते ज्यांचे जीन्स ग्रुप रायनसोबत जुळत होते. याचा सरळ अर्थ असा की, त्यांचे पूर्वज एक होते. रायन आणि त्याची सिंगल मदर वेंडीने लॉस ऐंजेलिस येथील पब्लिक रेकॉर्ड्सची पडताळणी केली. रायन आणि त्याच्या आईला तिच्या डोनरबाबत माहिती होती. कारण, स्पर्म बँकेने केवळ तेवढीच माहिती डोनरबाबत दिली होती. याच्याच आधारावर रायनने त्याच्या बायोलॉजिकल वडिलांबाबत माहिती मिळवली आणि ओळखही पटवली.

प्राप्त माहितीनुसार, DNA मॅचिंग सर्विस देणाऱ्या एकूण ४ वेबसाईट सध्यास्थितीत आहेत. या वेबसाईट्सचे युजर्स संख्येने इतके प्रचंड आहेत की, त्यात आपला दूरदूरचा एकही नातेवाई न मिळणे केवळ अशक्य आहे.