Chandra Grahan May  2021 Date: यंदाच्या वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण 26 मे दिवशी; पहा ग्रहणाचा कालवधी, सुतक काळ असेल का? सह सारी महत्त्वाची माहिती
Lunar Eclipse (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये यंदा पहिलं चंद्रग्रहण (Chandra Grahan) यंदा वैशाख पौर्णिमा (Vaishakh Pournima) म्हणजेच 26 मे दिवशी आहे. दरम्यान हे खग्रास चंद्रग्रहण (Khagras Chandra Grahan) आहे. खग्रास चंद्रग्रहणामध्ये चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीत असतो. खग्रास ग्रहणात पृथ्वीच्या सावलीमध्ये तो असल्याने चंद्रावर सूर्यप्रकाश पडत नाही. पृथ्वीभोवती असलेल्या वातावरणामधून प्रकाशकिरण अपवर्तित होऊन चंद्रावर पडतात. त्यातही लाल रंगाच्या प्रकाशकिरणाचे सर्वात जास्त अपवर्तन होत असल्याने अनेक ग्रहणांच्या वेळी चंद्र तांबूस दिसतो. दरम्यान हे चंद्रग्रहण दिवसा असल्याने भारतात दिसणार नाही. चंद्रग्रहण तारीख वेळ चंद्र ग्रहण 26 मे दिवशी दुपारी 02 वाजून 17 मिनिटांनी सुरू होणार आहे तर संध्याकाळी 07वाजून19 मिनिटांनी संपणार आहे. भारतात ग्रहणाच्या शेवटच्या काळात ते ईशान्य भारताच्या काही प्रदेशांमधून थोडं दिसण्याची शक्यता आहे.

चंद्र ग्रहणाचा  सुतककाळ

भारतात चंद्रग्रहण दिसणार नसल्याने या ग्रहणाचे वेध पाळले जाणार नाहीत तसेच या चंद्रग्रहणामध्ये सुतककाळ देखील नसेल. त्यामुळे मंदिरं पूजाविधीसाठी खुली ठेवली जाणार आहेत. कोणतेही धार्मिक विधी या काळात पाळण्याचे बंधन नसेल. नक्की वाचा: Buddha Purnima 2021: बुद्ध पौर्णिमा कधी आहे? तारीख, पूजा विधी, शुभ मुहूर्त, महत्त्व जाणून घ्या.

यंदा भारतामध्ये 2 चंद्र आणि 2 सूर्य ग्रहणं असतील. पण यापैकी कोणतेही कोणतेही चंद्रग्रहण थेट पाहता येणार नाही. दरम्यान 26 मे दिवशीचेही चंद्रग्रहण तुम्हांला थेट अनुभवता येणार नसले तरीही अवकाशीय, खगोलीय घटनांचा अभ्यास करणार्‍यांना हे बदल पाहण्याची उत्सुकता असणार्‍यांना सहाजिकच इंटरनेट वर ते पाहता येणार आहे. त्यासाठी विविध खगोलीय अभ्यास करणार्‍या संस्थांकडून ग्रहण पाहण्यासाठी लाईव्ह स्ट्रिमिंग उपलब्ध केले जाते. भारतामध्ये ग्रहणांच्या बाबतीत अनेकांच्या मनात समज-गैरसमज आहेत पण त्याकडे वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून पाहणं गरजेचे आहे.ही दरवर्षी अवकाशात घडणारी एक सामान्य घटना आहे.