Lenovo चा पहिला 5G टॅबलेट लॉन्च, युजर्सला मिळणार 10.3 इंचाच्या डिस्प्लेस 7500mAh ची बॅटरी
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

Lenovo ने आपला लेटेस्ट Lenovo Tab 6 5G टॅबलेट जपानमध्ये लॉन्च केला आहे. डिवाइसमध्ये 10.3 इंचाचा डिस्प्ले दिला असून तो स्नॅपड्रॅगन 690 SoC वर काम करणार आहे. टॅबलेटला लिनोवो द्वारे जपानमध्ये कंपनीद्वारे लॉन्च करण्यात आलेला पहिलाच 5G सक्षम Android टॅबलेट आहे. टॅबलेट पाणी आणि धुळीच्या रेजिस्टेंटसाठी IPX3 आणि IP5X सर्टिफिकेटसह येणार आहे. सध्या कंपनीने Lenovo Tab 6 5G च्या किंमतीचा खुलासा केलेला नाही. टॅबलेट एबिस ब्लू आणि मून व्हाइट रंगात येणार आहे. कंपनीने हा टॅब भारतात कधी लॉन्च केला जाणार याबद्दल अधिक माहिती दिलेली नाही.

Lenovo Tab 6 5G चे डायमेंन्शन 244X158X8.3mm आहे. यामध्ये 10.3 इंचाचा TFT डिस्प्ले दिला आहे. तसेच 4GB RAM सह स्नॅपड्रॅगन 690 5G SoC वर काम करणार आहे. यामध्ये 64GB चा इंटरनल स्टोरेज दिला गेला असून तो मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येणार आहे. टॅबलेटमध्ये 8MP चा रियर कॅमेरा आणि 8MP छा सेल्फी शूटर ही दिला आहे. टॅबलेट सिंगल नॅनो सिम स्लॉटसह येणार असून Android11 वर चालणार आहे.(चीन मध्ये Google, Facebook नंतर आता LinkedIn सुद्धा होणार बंद, मायक्रोसॉफ्टने केली मोठी घोषणा)

टॅबलेट किड्स स्पेस फिचरसह येणार आहे. या व्यतिरिक्त लिनोवो टॅब 6 6जी मध्ये प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी लर्निंग मोड दिले गेले असून त्यात काही अॅप आणि काही फंक्शन्स विशेष रुपात शिकण्यास मदत करणार आहेत. टॅबलेट एक PC मोड फिचर्ससह येणार आहे. जो युजर्सला स्प्लिट मोडमध्ये अॅप पाहता येऊ शकतात.