
जगभरातील करोडो युजर्स व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अवघ्या काही सेकंदात एकमेकांशी जोडले जातात. त्यामुळेच व्हॉट्सअॅप नेहमीच्या त्यांच्या युजर्ससाठी बदलत्या ट्रेन्ड नुसार नवे फिचर अॅपमध्ये रोलआउट करण्याचा प्रयत्न करतात. तर आता डिलिट मेसेज नावाचे फिचर आले असुन त्याचा फायदा युजर्सला होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे जरी व्हॉट्सअॅपवरील एखादा मेसेज तुमच्याकडून चुकून डिलिट झाल्यात तो पुन्हा मिळवता येणार आहे. मात्र लक्षात असू द्या डिलिट झालेला मेसेज बॅकअप घेतल्यानंतर आला असल्यास तो पुन्हा परत येऊ शकत नाही.
तर व्हॉट्सअॅपवर एकमेकांसोबत चॅटिंग करणे अतिशय मजेशीर असल्याचे जाणवते. मात्र भरपूर मेसेज, व्हिडिओ आणि फोटोमुळे तुमच्या मोबाईलची मेमरी भरली असल्याचे दाखवले जाते. मात्र आता एखादा मेसेज तुम्ही डिलिट केलाय आणि तो तुम्हाला पुन्हा हवा असेल तर तो मिळणार आहे. त्यासाठी मात्र तुम्हाला पुढील काही स्टेप्स लक्षात ठेवाव्या लागणार आहेत.(Whatsapp वापरकर्त्यांनो सावधान! New Year’s Virus लिंकवर क्लिक कराल तर, होईल मोठे नुकसान)
लोकल स्टोरेजच्या माध्यमातून कसा मिळवाल डिलिट झालेला मेसेज?
>>हा ऑप्शन फक्त अॅन्ड्रॉइड युजर्ससाठी असून iOS साठी काम करणार नाही आहे.
>>सर्वात प्रथम युजर्सला त्यांच्या फाइल मेनेजर येथे जावे लागणार आहे. त्यानंतर WhatsApp फोल्डरमध्ये Database येथे क्लिक करावे. या फोल्डरमध्ये सर्व बॅकअप फाइल्स दिसून येतील.
>> त्यानंतर msgstore.db.crypt12 या फाइलवर थोडा वेळाने प्रेस करुन नाव आल्यावर डिलिट करावे. असे केल्यानंतर msgstore_backup.db.crypt12 असे नवे नाव ठेवावे. नवे नाव ठेवल्याने नव्या फाइल रिप्लेस होणार नाहीत.
>> सर्वात लेटेस्ट बॅकअप फाइलचे नाव msgstore.db.crypt12 ठेवावे. यावर गुगल ड्राइव्ह येथे जात व्हॉट्सअॅप बॅकअप डिलिट करावे.
>>व्हॉट्सअॅप अनइन्स्टॉल केल्यानंतर पुन्हा इन्स्टॉल करावे.
>> नव्याने व्हॉट्सअॅप सुरु केल्यास लोकल स्टोरेजसाठी बॅकअप बाबत विचारले जाईल.
>> msgstore.db.crypt12 फाइल सिलेक्ट केल्यावर Restore या ऑप्शनवर क्लिक करावे.
तसेच युजर्सला गुगल ड्राइव्ह किंवा iCloude च्या माध्यमातून सुद्धा डिलिट झालेला मेसेज मिळवता येणार आहे. मात्र यासाठी युजर्सला व्हॉट्सअॅप डिलिट करुन पुन्हा इन्स्टॉक करते वेळी मागण्यात येणाऱ्या बॅकअपनंतर तो मेसेज तुम्हाला परत मिळण्यास मदत होणार आहे.