देशभरात व्हाट्सऍप (Whatsapp) हे अधिक लोकप्रिय झाले आहे. तसेच फेसबूक ऍपनंतर व्हाट्सऍपचे मोठ्या प्रमाणात वापरकर्ते आहेत. व्हाट्सऍप हे अनेक कामात उपयोगी ठरत चालले आहे. यातच व्हॉट्सएप संदर्भात धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. सध्या व्हॉट्सवर नवीन वर्षाच्या निमित्ताने एक लिंक पाठवली जात आहे. या लिंकच्या माध्यमातून काही हॅकर्सनी लुबाडण्याचे धंदे सुरु केले आहेत. यामुळे व्हॉट्सऍप वापरकर्त्यांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, व्हॉट्सऍपच्या इतर वापरकर्त्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जात आहे.
व्हॉट्सऍपवर अनेकदा वेगवेगळे मॅसेजेस येत राहतात. परंतु याच मॅसेजच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही हॅकर्स व्हॉट्सऍपवर एक लिंक पाठवतात. वरवर पाहता ही लिंक नव्या वर्षाच्या शुभेच्छा देणारी वाटते. मात्र, या लिंकवर क्लिक केल्यावर एक व्हायरस मोबाईलमध्ये शिरतो. हा व्हायरस मोबाईलमधील संपूर्ण माहिती काढून घेतो आणि हॅकर्सपर्यंत पोहोचवतो. नव्या वर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने मोबाईलमध्ये येणाऱ्या या व्हायरसचे ‘New Year’s Virus’असे नाव आहे. महत्वाचे म्हणजे, हे सर्व मॅसेज शुभेच्छांचे असतात. यामुळे व्हॉट्सऍप वापरकर्त्यांच्या मनातील उस्तुकता वाढते. व्हॉट्सऍपचे काही वापरकर्ते अशाप्रकारच्या लिंकवर क्लिक देखील करतात आणि आमिषाला बळी पडतात. (हे देखील वाचा- Xiaomi स्मार्टफोनमध्ये होणार मोठा बदल, 'हे' महत्वाचे फिचर वापरता येणार नाही)
सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांची लूटमार झाल्याचे समोर आले आहे. हॅकर्सला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून अनेक प्रयत्न केले जातात. तसेच व्हॉट्सऍपच्या वापरकर्त्यांनी सर्तक राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अशाप्रकारच्या लिंक व्हॉट्सअॅपवर व्हायरल होऊ नये, यासाठी योग्य प्रकारच्या यंत्रणा अंमलात यायला हवी. यासाठी काम सुरु देखील असेल मात्र सध्यातरी युजर्सने काळजी घेणे अधिक महत्वाचे आहे.