Google India कोविड-19 लसीकरण केंद्र शोधण्यासाठी करणार युजर्स मदत; Health Ministry आणि Bill Gates Foundation सोबत भागीदारी
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: New York Post)

युजर्संना कोविड-19 लसीकरण केंद्र ( COVID-19 Vaccination Centre) शोधण्यासाठी आता गुगल इंडिया (Google India) मदत करणार आहे. त्यासाठी गुगल इंडियाने केंद्रीय आरोग्य मंत्रालय (Health Ministry) आणि बिल गेट्स फाऊंडेशन (Bill Gates Foundation) सोबत भागीदारी केली आहे. गुगल मॅप्सवर (Google Maps) लसीकरण केंद्रे शोधण्यासाठी आणि त्यासंबंधित मार्गदर्शन करण्यासाठी गुगल इंडिया मदत करणार आहे. येत्या काही आठवड्यांमध्ये लसीकरण केंद्राविषयीची माहिती गुगल मॅप्सवर उपलब्ध  होईल, असे गुगल इंडियाने सांगितले आहे. 16 जानेवारी पासून देशभरता कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून कोविशिल्ड आणि कोव्हॅसिनचे अजूनपर्यंत देशामध्ये 2.6 कोटी कोविड-19 लसीचे डोसेस देण्यात आले आहेत. (Google Maps चे नवे फिचर; कोविड-19 च्या संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी करेल मदत)

कोरोना व्हायरसचे संकट अद्याप संपलेले नाही. या कोरोना व्हायरसच्या काळामध्ये देशातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचा गुगल इंडियाचा मानस आहे. देशामधील लसीकरण यशस्वीरीत्या पार पडल्यास आपण ही परिस्थिती पूर्णपणे बदलू शकतो, असे गुगल इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या रॅपिड रिक्स रिपॉन्स टीमसोबत कंपनी काम करत आहे. सोशल मीडियावर विविध भाषांमध्ये पसरवल्या जाणाऱ्या सर्व चुकीच्या माहितीचा आढवा घेऊन त्यासंबंधित लोकांना योग्य तो मार्गदर्शन करत आहोत. भारत सरकारकडून जसे लसीकरण टप्प्याटप्प्याने होत आहे. तसे गुगल इंडियाकडून लसीकरणासंबंधित लोकांना पडलेले प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न चालू आहेत. (Google Maps Gets COVID Layer: 220 देशांच्या गुगल मॅपमध्ये दिसणार कोविड लेअर; सुरक्षित प्रवासासाठी कोविड-19 डेटा मॅपवर उपलब्ध)

आम्ही केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि बिल गेट्स फाऊंडेशन सोबत भागीदारी करुन या लसीकरण मोहिमेत टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने आम्ही आमचे योगदान देत आहोत, असे गुगल इंडियाने सांगितले.

लसीकरणाचा पहीला टप्पा संपल्यानंतर गुगलने आपल्या प्लॅटफॉर्मवर लसीकरणासंबंधित माहिती देण्यास सुरुवात केली. यामध्ये लोकांना पडलेले प्रश्न, दोन्ही लसींचा सक्सेस रेट, दुष्परिणाम आणि त्यांचे वितरण यासंबंधिची माहिती इंग्लिश, तामिळ, तेलुगु, मल्याळम, कनडा, मराठी, गुजराती, बंगाली आणि हिंदी या भाषांमध्ये गुगल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध केली आहे.