Google Maps (Photo Credits: IANS)

कोरोना व्हायरसच्या संकट काळात (Coronavirus Pandemic) लोकांना सहज आणि सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी गुगलने गुगल मॅप्समध्ये (Google Maps) कोविड लेयर (COVID Layer) टाकण्याचा निर्णय घेतला आहे. जगभरातील 220 देशांच्या मॅप्समध्ये कोविड लेअर टाकण्यात आला आहे. या कोविड लेअरमुळे तुम्ही प्रवास करत असलेल्या विभागातील कोरोनाग्रस्तांची माहिती तुम्हाला मॅपवरुन मिळेल. जगभरातील अॅनरॉईड (Android) आणि आयओएस (iOS) फोन्समध्ये या आठवड्यापासून कोविड लेअर दिसण्यास सुरुवात होईल. या लेअरमध्ये दिसणारी माहिती ही जॉन्स हॉपकिन्स (Johns Hopkins), द न्युयॉर्क टाईम्स (New York Times) आणि विकीपीडिया (Wikipedia) यांसारख्या अधिकृत सुत्रांकडून देण्यात आली आहे. प्रत्येक देशातील हॉस्पिटल्स, सरकार आणि WHO यांच्या संमतीने माहिती घेण्यात आली आहे. (Google Maps चे नवे लोकेशन शेअरिंग फिचर; आता Exact Location शेअर करणे अधिक सोपे)

गुगल मॅप्स ओपन केल्यानंतर मॅप्सच्या उजव्या बाजूला असलेल्या लेअर्स पर्यायावर क्लिक करा आणि त्यामधून कोविड-19 इन्फो हा पर्याय निवडा. हा पर्याय निवडल्यानंतर त्या विभागातील गेल्या 7 दिवसांमध्ये 1 लाख लोकांमागे कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या किती याची सरासरी पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे त्या विभागातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतेय की कमी होतेय, हे एका लेबलद्वारे युजरला कळेल, अशी माहिती गुगल मॅप्सचे प्रॉडक्ट मॅनेजर सुजॉय बनर्जी यांनी दिली आहे. (Google Maps चे नवे फिचर; कोविड-19 च्या संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी करेल मदत)

गुगल मॅपमध्ये कलर कोडिंग स्कीम देण्यात आली आहे. त्यामुळे त्या विभागातील नवीन कोरोनाग्रस्तांची संख्या सहजरित्या ओळखता येईल. त्याचप्रमाणे 220 देशांचा कोविड-19 डेटा या मॅप्सवर उपलब्ध असेल. प्यापुलर टाईम्स, लाईव्ह बिझनेस, Covid-19 alerts in transit आणि Covid checkpoints यांसारख्या फिचर्स लोकांच्या सुरक्षित प्रवासासाठी विकसित केल्याचे बनर्जी यांनी सांगितले आहे. दरम्यान, कोविड-19 संकट काळात गरजेचे वस्तू शोधण्यासाठी आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी 100 कोटींहून अधिक लोकांनी गुगल मॅप्सचा वापर केला आहे.