Google Maps | Representational Image | (Photo Credit Digitaltrends.com)

गुगल मॅप्स (Google Maps) साठी नवे अपडेट रोल आऊट झाले आहे. या नव्या अपडेटसह गुगल मॅप्सचे लोकेशन शेअरिंग फिचर अपग्रेड केले आहे. त्यामुळे युजर्स आपले लोकेशन प्लस कोड्ससह शेअर करु शकतात. गुगल मॅपने हे फिचर सध्या अॅनरॉईड युजर्ससाठी सुरु केले आहे. प्लस कोडचा (Plus Code) ऑप्शन गुगल अॅपमध्ये ऑगस्ट 2015 पासून उपलब्ध आहे. परंतु नव्या अपडेटमध्ये युजर्स प्लस कोड्सचा वापर करुन इतर कोणालाही आपले एक्झाक्ट लोकेशन (Exact Location) पाठवू शकतात.

तुमच्या मोबाईलमध्ये नेव्हिगेशनसाठी प्लस कोड हा एक डिजिटल अॅड्रेस असून तो लॉन्गिट्यूड आणि लॅटिट्यूड को-ओर्डिनेशन्सपासून बनवला जातो. गुगल मॅप्सच्या नेव्हिगेशन अॅपमध्ये ग्लोबल पोजिशनिंग स्टिटम (GPS) चा उपयोग करुन लॉन्गिट्यूड आणि लॅटिट्यूड कॅल्युलेट केला जातो. या डिजिटल अॅड्रेसमध्ये प्लस कोड जनरेशन टेक्नॉलोजीचा वापर केला गेला आहे.

गुगल मॅप्सचे प्रोग्रॅम मॅनेजमेंटचे डिरेक्टर डेविड मार्टिन यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्लस कोड जनरेट करणारी टेक्नॉलोजी ही एक ओपन सोर्स कोड आहे. याचा अर्थ असा की, ही टेक्नॉलोजी फ्री असून या टेक्नॉलोजीचे काम कसे चालते, हे तुम्ही सहजरित्या पाहू शकता आणि याच्या आधारावर अॅप देखील डेव्हलप करु शकता.

गुगल मॅप्समध्ये शेअर केलेल्या लोकेशन्सचा प्लस कोड पाहण्यासाठी मॅप मधील ब्लू डॉटवर क्लिक करा. जर एखाद्या लोकेशनचा प्लस कोड काढायचा असेल तर त्या लोकेशनवर लॉन्ग प्रेस करुन पीन मार्क करा आणि तुम्हाला त्याचा प्लस कोड मिळेल. मिळालेला प्लस कोड कॉपी करुन इच्छित व्यक्तीला पाठवू शकता. हा कोड व्हॉट्सअॅप सारख्या मेसेजिंग अॅपद्वारे किंवा टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून पाठवू शकता. या नव्या फिचर व्यतिरिक्त गुगल मॅप्समध्ये अजून काही नव्या गोष्टी अॅड करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये तुमच्या जवळपास कुठे पार्किंग आहे, हे कळते.