Google Maps चे नवे फिचर; कोविड-19 च्या संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी करेल मदत
Google Maps | Representational Image | (Photo Credit Digitaltrends.com)

सध्या जगभरात कोरोना व्हायरस (Coronavirus) धुमाकूळ घालत आहे. कोविड-19 च्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी गुगलने (Google) आपल्या मॅप (Map) सर्व्हिसमध्ये एक खास फिचर अॅड केले आहे. Google Maps मधील या नव्या फिचरच्या मदतीने कोरोना व्हायरसच्या कठीण काळात संसर्गापासून बचाव करता येईल. फिचरला युजर्सपर्यंत पोहचवण्यासाठी नवे अपडेट (New Update) रोलआऊट करण्यात आले आहे. अनेक देशात रिलीज झालेल्या या अपडेटमध्ये युजर्सला टेस्ट सेंटर लोकेशन आणि कोविड-19 बॉर्डर चेक्सची माहिती मिळेल. (Google Maps चे नवे लोकेशन शेअरिंग फिचर; आता Exact Location शेअर करणे अधिक सोपे)

ट्रेन, स्टेशनवरील गर्दीचा अंदाज घेण्यासाठी:

गुगलने दिलेल्या माहितीनुसार, या नव्या अपडेटच्या मदतीने युजर्स आता ट्रेन स्टेशन वर असलेल्या गर्दीच्या अंदाज घेऊ शकतात. तसंच त्यानुसार आपल्या प्रवासाची आखणी करु शकतात. कोविड-19 संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे या नव्या अपडेटचा नक्कीच फायदा होईल.

अॅनरॉईड आणि iOS साठी रोलआऊट झाले फिचर:

कंपनीने सोमवारी एका ब्लॉगद्वारे गुगल मॅप्समध्ये आलेल्या नव्या अपडेट्सची माहिती दिली. गुगल मॅप्सने या अपडेटला अॅनरॉईड सह iOS साठी देखील रोलआऊट केले आहे. तसंच हे अपडेट युजर्सला एका जागेवरुन दुसऱ्या जागी सुरक्षित पोहण्यासाठी मदत करेल.

कोरोना व्हायरस संसर्गापासून बचाव करण्यासाठी ठरेल मदतगार:

सध्याच्या कोविड-19 च्या काळात संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी बाहेर पडण्यापूर्वी कुठे किती गर्दी आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे. म्हणूनच याची योग्य माहिती स्मार्टफोन अॅपद्वारे मिळाली तर अधिक उत्तम होईल. त्यामुळे कोरोना व्हायरस संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी हा अॅप अतिशय मदत करेल.

या देशांमध्ये फिचर होईल रोलआऊट:

गुगल लवकरच हे फिचर भारतासह अर्जेंटीना, फ्रान्स, नेदरलँड्स, अमेरिका आणि ब्रिटेन मध्ये रोलआऊट करणार आहे. तसंच कंपनी हे फिचर जगभरातील इतर देशांमध्येही रिलिज करेल किंवा नाही याबद्दल अद्याप खात्रीशील माहिती मिळालेली नाही.

यापूर्वी गुगल मॅपने लोकेशन शेअरिंग फिचर लॉन्च केले होते. त्या फिचरद्वारे Exact Location शेअर करणे आता सोपे होणार आहे.