WhatsApp वर चुकूनही पाठवू नका 'या' 5 प्रकारचे मेसेज; अन्यथा तुम्हाला जाव लागू शकतं तुरुगांत
WhatsApp | Representational Image (Photo Credits: Pixabay)

सध्याच्या युगात प्रत्येक व्यक्ती WhatsApp चा वापर करतो. परंतु, कदाचित खूप कमी लोकांना व्हॉट्सअॅप सुरक्षितपणे कसे वापरावे, याची लोकांना माहित असेल. व्हॉट्सअ‍ॅपवरून केलेले काही मेसेज तुम्हाला जेलची हवा खायला लावू शकतात. त्यामुळे अशा स्वरुपाचे व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस पाठवताना काळजी घेणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला अशाचं काही मेसेजबद्दल सांगणार आहोत. जे मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला तुरुंगात जाव लागू शकतं. म्हणून हे टाळण्यासाठी तुम्हाला अशा मेसेजसंदर्भात माहिती असणं गरजेचं आहे. चला तर मग अशा मेसेजसंदर्भात जाणून घेऊयात... (वाचा - Whatsapp कडून Vaccines for All Stickers चे अनावरण; कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी उचलले महत्वाचे पाऊल)

भडकाऊ संदेश पाठवू नका-

आपण कोणत्याही चित्रपटाची पायरेसी लिंक किंवा 21 दिवसांत पैसे दुप्पट करण्यासाठी लिंक व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवित असाल तर आपले खाते बंद केले जाऊ शकते. एखाद्या व्यक्तीने आपल्या संदेशाविरूद्ध तक्रार दाखल केल्यास आपल्यावर कारवाई होऊ शकते. व्हॉट्सअ‍ॅपवर धमकावणारे असभ्य संदेश पाठवू नका. हे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. तुम्ही पाठवलेल्या संदेशाची तक्रार एखाद्या व्यक्तीने पोलिस स्टेशनमध्ये केली, तर तुमची चौकशी होऊन योग्य कारवाई केली जाऊ शकते.

हे मेसेज फॉरवर्ड केल्यास होऊ शकते जेल -

व्हॉट्सअ‍ॅपवर कोणालाही भडकाऊ संदेश पाठवू नका. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर कोणालाही आत्महत्या करण्यास प्रोत्साहित करू नका. व्हॉट्सअ‍ॅपवर असा कोणताही संदेश लिहू नका किंवा पुढे पाठवू नका. कारण ते गुन्हेगारीच्या कक्षेत येते. आपल्याविरूद्ध भारतीय दंड संहितेअंतर्गत चुकीच्या संदेशांची देवाणघेवाण करण्यासाठी आयपीसीच्या विविध कलमांतर्गत कायदेशीर कारवाई केली जावू शकते. तसेच संदेश पाठविणारा तितकाच दोषी आहे असल्याचे समजून समान शिक्षेची तरतूद करण्यात येते. मद्रास उच्च न्यायालयाने आपल्या 2018 च्या निकालात म्हटले होते की, चुकीचा संदेश पाठविणे, संदेश स्वीकारणे आणि फॉरवर्ड करणे एक प्रकारचा गुन्हा आहे.

बनावट खाते तयार करू नका -

व्हॉट्सअ‍ॅपवर बनावट अकाउंट तयार करून लोकांना त्रास देऊ नका. बनावट खात्यांसह लोकांना त्रास देणे, हे गुन्ह्याच्या कक्षेत असल्याचे मानले जाते. जर कोणी आपल्या बनावट खात्याविरुद्ध तक्रार दिली तर आपल्याला तुरूंगात जावे लागू शकते.

बल्क संदेश पाठवू नका -

बल्क संदेश तयार करून ते एखाद्या ग्रुपमध्ये पाठवू नका, बल्क संदेश पाठवण्याची प्रक्रिया थांबविली पाहिजे. कारण, या मोठ्या गटांकडून हजारो संदेश पाठविण्यामुळे तुमचे खातेचं बंद होणार नाही, तर तुमच्यावर पोलिस कारवाईही होऊ शकते. व्हॉट्सअ‍ॅप पॉलिसीविरूद्ध बल्क संदेशांचा विचार केला जातो.

सॉफ्टवेअर हॅक करण्याचा प्रयत्न करू नका -

आपण सॉफ्टवेअर अभियंता असल्यास, चुकूनही सॉफ्टवेअर हॅक करू नका. कारण व्हॉट्सअॅप सॉफ्टवेअर हॅक करण्याचा प्रयत्न करणे, हा एक गंभीर गुन्हा मानला जातो. व्हॉट्सअ‍ॅप सॉफ्टवेअर हॅक केल्याबद्दल कंपनीकडून कायदेशीर नोटीस पाठविली जाऊ शकते.