Whatsapp कडून  Vaccines for All Stickers चे अनावरण; कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी उचलले महत्वाचे पाऊल
WhatsApp Launches New Vaccine for All Sticker Pack (Photo Credit: WhatsApp)

कोरोनाने (Coronavirus) संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. कोरोना विषाणूशी सध्या संपूर्ण जग लढत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी जगभरात लसीकरण (COVID-19 Vaccine) सुरु आहे. यातच कोरोना लसीकरणाबाबत जगजागृती करण्यासाठी व्हॉट्सअॅपने (WhatsApp) महत्वाचे पाऊल उचलले आहे. व्हॉट्सअॅपने आता कोविड-19 थीम असलेले स्टीकर्स लॉन्च केले आहेत. या स्टीकर्सच्या माध्यमातून जगभरातील आरोग्य कर्मचार्‍यांचे कौतुक करण्याचे काम केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) सहकाऱ्याने हे कोविड स्टिकर पॅक विकसित केले गेले आहेत. व्हॉट्सअॅपने दीडशेहून अधिक राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक सरकारच्या सहकाऱ्याने डब्ल्यूएचओ आणि यूनआयसीइएफसोबत मिळून कोरोनाशी संबंधित अचूक माहिती देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

डब्ल्यूएचओने डिझाइन केलेले व्हॉट्सअ‍ॅपच्या व्हॅसिन फॉर ऑल स्टिकर पॅकमध्ये 23 भिन्न स्टिकर्स देण्यात आले आहेत. हा स्टिकर अँड्रॉइड आणि आयओएस वापरकर्त्यांना डाउनलोड करता येणार आहे. या 23 स्टिकर्सपैकी काही आरोग्य कर्मचार्‍यांना प्रोत्साहित करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. जगभरात कोरोनाची लस दिली जात आहेत, हे सर्वांना माहिती आहे. दरम्यान, कोरोना लसीकरणाबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी व्हॉट्सअपने हे पाऊल उचलले आहे. हे देखील वाचा- Flipkart Mobiles Bonanza Sale ला सुरुवात; Phone 11, iPhone SE, Moto G10 Power सह 'या' स्मार्टफोनवर भरगोस सूट

ट्वीट-

जगभरात गेल्या 3 वर्षांपासून जवळपास 3 अब्जाहून अधिक फेक मॅसेज पाठविण्यात आले आहेत. यामुळे कोविड-19 लसीकरणाच्या चुकीच्या माहितीचा खुलासा करण्यासाठी भारतासह अनेक देशात हेल्पलाईन सेवा सुरु करण्यात आली आहे. याचदरम्यान, कोरोना संबंधित भारतीयांना अचूक माहिती पुरविण्यासाठी भारतात व्हॉट्सअ‍ॅपने मायगोव्ह आणि रिलायन्स ओन्ड एआय प्लॅटफॉर्म हॅप्टिकबरोबर भागीदारी केली आहे.