Budget 2019: अर्थसंकल्प 2019 सादर झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक वस्तू महागणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. जर सरकारने सीईएमईए (CEAMA) यांची शिफारस मान्य केल्यास 'या' वस्तूंच्या किंमती वाढणार आहेत. तसेच सीईएमईएने सरकारला आयात केल्या जाणाऱ्या वस्तू म्हणजेच टीव्ही, एसी, रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशिन या वस्तूंवरील कस्टम ड्युटी वाढवण्याची मागणी केली आहे.
तसेच कंप्रेसर, ओपन सेल आणि डिस्प्ले पॅनल सारख्या उत्पादनांवर ही कस्टम ड्युटी वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. असोशिएशने घरगुती साहित्याच्या वस्तूंचे उत्पादन वाढविण्यासाठी कस्टम ड्युटी 5 टक्क्यांवरुन 10 टक्के करण्यात आली आहे. (हेही वाचा-Budget 2019: मोदी सरकारकडून संसदेची परंपरा कायम राखली जाणार; 1 फेब्रुवारीला पियुष गोयल सादर करणार अंतरिम अर्थसंकल्प)
असोशिएनचे अध्यक्ष कमल नंदी यांनी, या मार्गाने गेल्यास उत्पादकांना प्रतिस्पर्धात्मक किंमतीच्या आधारावर उत्पन्न निर्माण होण्यासाठी मदत मिळेल असे सांगितले. त्याचसोबत निर्यातीलासुद्धा चालना मिळणार आहे. अर्थसंक्लप 2018 नुसार सरकारने मोबाईल फोनवर कस्टम ड्युटी 15 टक्के न ठेवता 20 टक्के केली होती.
त्याचसोबत गेल्या वर्षात रुपयात घसरण आणि कच्च्या तेलाच्या किंमती सातत्याने वाढत असल्याने सरकारने 10KG कमी वजनाच्या वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर आणि ऐसीवर कस्टम ड्युटी 10 टक्क्यांवरुन 20 टक्के केली होती. तर येत्या 1 फेब्रुवारीला पिय़ुष गोयल यांच्याकडून अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.