10 Most In Demand Job Skills: जाणून घ्या सध्याची सर्वाधिक मागणी असलेली 10 नोकरी कौशल्ये; World Economic Forum ने जाहीर केला अहवाल
Job प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) ने नुकताच 'फ्यूचर ऑफ जॉब्स रिपोर्ट 2023' (Future of Jobs Report 2023) जारी केला आहे. अहवालात प्रामुख्याने असे म्हटले आहे की, 2027 पर्यंत सुमारे एक चतुर्थांश नोकऱ्या बदलणार आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या गैर-सरकारी संस्थेच्या म्हणण्यानुसार, येत्या काही वर्षांत लाखो नोकऱ्या किंवा पदे संभाव्यपणे काढून टाकल्या जातील किंवा निर्माण केल्या जातील.

तांत्रिक प्रगतीपासून ते हवामान बदलापर्यंतच्या अनेक गोष्टी याला कारणीभूत आहेत. परंतु एक गोष्ट निश्चित आहे, ती म्हणजे अनेक कामगारांना नव्या परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागेल किंवा स्पर्धेत टिकण्यासाठी काही नव्या गोष्टी आत्मसात कराव्या लागतील. सर्वेक्षण 11 दशलक्षांपेक्षा जास्त कामगारांना रोजगार देणाऱ्या सुमारे 800 कंपन्यांच्या इनपुटवर तसेच 673 दशलक्ष नोकऱ्यांच्या डेटासेटवर आधारित आहे.

आपल्या ताज्या अहवालात, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने सध्या कोणती नोकरी कौशल्ये महत्त्वाची आहेत आणि येत्या काही वर्षांत कोणती महत्त्वाची ठरतील हे मांडले आहे. यामध्ये Analytical and Creative Thinking ला सर्वाधिक मागणी असेल. त्यानंतर यामध्ये Technological Literacy, Curiosity and Lifelong Learning, Resilience and Flexibility, Systems Thinking, AI and Big Data, Motivation and Awareness, Talent Management, Service Orientation and Customer Service, Quality Control, Leadership and Social Influence अशा स्किल्सचा समावेश होतो.

सर्वेक्षण केलेल्या कंपन्यांनी दर्शविले आहे, ही कौशल्ये सर्वात वेगाने वाढत आहेत आणि कामाच्या ठिकाणी जटिल समस्या सोडवण्यासाठी महत्वपूर्ण ठरत आहेत. अहवालानुसार, कमी मागणी असलेल्या कौशल्यांमध्ये Global Citizenship, Sensory Processing Abilities and Manual Dexterity, Endurance and Precision यांचा समावेश होतो. अहवालात असे दिसून आले आहे की, नोकऱ्यांमधील सर्वात मोठा नफा शिक्षण (3 दशलक्ष नोकर्‍या), कृषी (4 दशलक्ष नोकर्‍या), काही प्रमाणात लोकसांख्यिकी आणि काही प्रमाणात नवीन तंत्रज्ञानाचा वापर या क्षेत्रात दिसून येईल. (हेही वाचा: Cuemath Layoffs: एडटेक स्टार्टअप क्यूमॅथने 100 कर्मचाऱ्यांना दिला नारळ; संस्थापक मनन खुर्मा सांभाळणार सीईओ पदाची धुरा)

पुढे अहवालात असे नमूद केले आहे की, व्यवस्थापन कौशल्ये, प्रतिबद्धता कौशल्ये, तंत्रज्ञान कौशल्ये, नैतिकता आणि शारीरिक क्षमता हे सामान्यत: आकलनशक्ती, स्व-कार्यक्षमता आणि इतरांसोबत काम करण्याची तयारी या पेक्षा कमी महत्त्वाचे मानले गेले आहे. तंत्रज्ञान आणि डिजिटलायझेशन हे रोजगार निर्मितीची आणि विनाशाची कारणे आहेत, असे अहवालाच्या सारांशात म्हटले आहे.

शेवटी अहवालात असेही म्हटले आहे की, ‘प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब आणि वाढत्या डिजिटायझेशनमुळे श्रमिक बाजारपेठेत लक्षणीय मंथन होईल.’ सर्वात वेगाने घटणाऱ्या नोकऱ्या या सचिवीय आणि लिपिकीय नोकऱ्या असतील. बँक टेलर आणि कॅशियर सारखी कामे स्वयंचलित केली जाऊ शकतात. दुसरीकडे एआय मशीन लर्निंग तज्ञ आणि सायबर सुरक्षा तज्ञांची मागणी लक्षणीय वाढण्याची अपेक्षा आहे, असे त्यात म्हटले आहे.