Maharashtra Kesari Kusti: 63व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे पुणे येथे आयोजन; 2 ते 7 जानेवारी मध्ये रंगणार थरार
Kusti Image For Representation (Photo Credits: Instagram)

63rd Maharashtra Kesari Kusti Spardha Dates: महाराष्ट्रात सर्वात मानाची मानली जाणारी महाराष्ट्र केसरी कुस्ती (Maharashtra Kesari Kushti) स्पर्धा यंदा 2 ते 7 जानेवारी  2020 दरम्यान पुणे (Pune) येथे आयोजित केली जाणार आहे. पुण्याच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात (Shivchatrapti Krida Sankul) ही स्पर्धा रंगणार आहे. ही स्पर्धा दहा वजनी गटात होणार असून यामध्ये प्रत्येक गटात माती आणि मॅट अशी वर्गवारी केली जाणार आहे. यापैकी 86 ते 125 वजनगटातील माती आणि मॅट गटाच्या विजेत्या पेहलवानांमध्ये महाराष्ट्र कुस्ती किताबाची कुस्ती खेळवण्यात येणार आहे. अलीकडेच पुण्यात या स्पर्धेच्या नव्या लोगोचे अनावरण करण्यात आले. ('महाराष्ट्र केसरी' विजेत्याला बहाल करण्यात येणारी 'चांदीची गदा' नेमकी कशी असते?)

मामासाहेब मोहोळ यांच्याकडून 1961 पासून या कुस्ती स्पर्धेची सुरुवात करण्यात आली होती . मात्र कुस्तीगीर परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मामासाहेब मोहोळ यांचे 1982 साली निधन झाल्यानंतर ही परंपरा मोहोळ कुटुंबीयांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला सुपूर्द केली. गेली 36 वर्ष मोहोळ कुटुंबीयांकडून 'महाराष्ट्र केसरी' विजेत्यासाठी चांदीची गदा बनवून देण्यात येते.महाराष्ट्र केसरीच्या विजेत्याला चांदीची गदा आणि 2 लाख रुपयाचं रोख बक्षीस दिले जात असल्याने ही स्पर्धा अत्यंत चर्चेची ठरते. (Maharashtra Kesari Kusti 2018: बाला रफिक शेख, महाराष्ट्र केसरी कुस्ती 2018 विजेते, पहा 1961-2018 पर्यंत कोण कोण आहेत विजेते)

मागील वर्षी या स्पर्धेचा अंतिम खेळ हा जालना येथे रंगला होता, ज्यामध्ये बाला रफिक शेख यांनी 2018 च्या 'महाराष्ट्र केसरी'चा मान पटकावला होता. या स्पर्धेत राज्यभरातून अनेक मातब्बर कुस्तीपटू सहभागी होत असतात त्यामुळे ही मानाची कोण जिंकणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून असते.