Maharashtra Kesari Kusti 2018: बाला रफिक शेख, महाराष्ट्र केसरी कुस्ती 2018 विजेते, पहा 1961-2018 पर्यंत कोण कोण आहेत विजेते
महाराष्ट्र केसरी कुस्ती विजेते ( photo Credit: twitter)

Maharashtra Kesari Kusti 2018:  महाराष्ट्र केसरी कुस्ती 2018  स्पर्धेचा विजेता कोण ठरणार याची उत्सुकता आता संपली आहे. गतवर्षीचा महाराष्ट्र्र केसरी विजेता अभिजित कटके (Abhijeet Katke) या पेहलवानावर माती विभागातील बाला रफिक शेख (Bala Rafiq) याने मात केली आहे. 26 वर्षीय बाला रफिक शेख हे माती विभागातून केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचले होते. अंतिम फेरी मॅट म्हणजे गादीवर खेळली जाते त्यामुळे ही स्पर्धा अभिजीतसाठी फायदेशीर असेल असे त्याच्या चाहत्यांना वाटले होते. मात्र अखेर बाला रफिक शेख अभिजितवर भारी पडले आहेत. बाला रफिक शेख यांनी अभिजित कटकेवर 11-3  ने मात करत महाराष्ट्र केसरीची मानाची चांदीची गदा मिळवली आहे.  Maharashtra Kesari Kusti 2018: महाराष्ट्र केसरी स्पर्धेदरम्यान गोंधळ, काका पवार तालमीचा स्पर्धेवर बहिष्कार

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे विजेते

१) पैलवान दिनकरराव दह्यारी-१९६१

२) पैलवान भगवान मोरे -१९६२

३) स्पर्धा रद्द- १९६३

४) पैलवान गणपतराव खेडकर -१९६४

५) पैलवान गणपतराव खेडकर-१९६५

६) पैलवान दिनानाथ सिंह-१९६६

७) पैलवान चंबा मुतनाळ -१९६७

८) पैलवान चंबा मुतनाळ-१९६८

९) पैलवान हरिश्चंद्र बिराजदार -१९६९

१०) पैलवान लक्षण वडार -१९७०

११) पैलवान दादू मामा चौगुले -१९७१

१२) पैलवान लक्ष्मण वडार-१९७२

१३) पैलवान लक्षण वडार -१९७३

१४) पैलवान युवराज पाटील -१९७४

१५) पैलवान रघुनाथ पवार -१९७५

१६) पैलवान हिरामण बनकर -१९७६

१७) अनिर्णित -१९७७

१८) पैलवान अप्पा कदम -१९७८

१९ ) पैलवान शिवाजीराव पाचपुते -१९७९

२०) पैलवान इस्माइल शेख -१९८०

२१) पैलवान बापू लोखंडे -१९८१

२२) पैलवान संभाजी पाटील-१९८२

२३) पैलवान सरदार खुशहाल -१९८३

२३) पैलवान नामदेव मुळे-१९८४

२४) पैलवान विष्णुजी जोशीलकर -१९८५

२५) पैलवान गुलाब बर्डे -१९८६

२६) पैलवान तानाजीराव बनकर-१९८७

२७) पैलवान रावसाहेब मगर -१९८८

२८) अनिर्णित -१९८९

२९) अनिर्णित-१९९०

३०) अनिर्णित -१९९१

३१) पैलवान अप्पालाल शेख -१९९२

३२) पैलवान उदयराज यादव -१९९३

३३) पैलवान संजय दादा पाटील-१९९४

३४) पैलवान शिवाजी केकान १९९५

३५) स्पर्धा रद्द…१९९६

३६) पैलवान अशोक शिर्के-१९९७

३७) पैलवान गोरख सरक -१९९८

३८) पैलवान धनाजी फडतरे -१९९९

३९) पैलवान विनोद चौगुले -२०००

४०) पैलवान राहुल काळभोर-२००१

४१) पैलवान मुन्नालाल शेख -२००२

४२) पैलवान दत्ता गायकवाड -२००३

४३) पैलवान चंद्रहास निमगिरे -२००४

४४) पैलवान सइद चाऊस -२००५

४५) पैलवान अमोल बुचडे -२००६

४६) पैलवान चंद्रहार पाटील-२००७

४७) पैलवान चंद्रहार पाटील -२००८

४८) पैलवान विकी बनकर-२००९

४९) पैलवान समाधान घोडके-२०१०

५०) पैलवान नरसिंह यादव- २०११

५१) पैलवान नरसिंग यादव-२०१२

५२) पैलवान नरसिंग यादव-२०१३

५३) पैलवान विजय चौधरी-२०१४

५४) पैलवान विजय चौधरी-२०१५

५५) पैलवान विजय चौधरी-२०१६

५६) पैलवान अभिजीत कटके-२०१७

५८) पैलवान बाला रफिक शेख - २०१८

बाला रफिक शेख हे मूळचे बुलढाण्याचे आहेत. पहिल्यांदाच बाला शेख महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहचले होते. संधीचं सोनं करत त्यांनी विजेतेपदावर नाव कोरलं आहे.