Maharashtra Kesari Kusti 2018:  बाला रफिक शेख ठरला 2018 च्या 'महाराष्ट्र केसरी'चा मानकरी
बाला रफिक शेख यंदाचा 'महाराष्ट्र केसरी' (Photo Credit: Facebook)

Maharashtra Kesari Kusti 2018:  बाला रफिक शेख  2018  च्या 'महाराष्ट्र केसरी'चा मानकरी ठरला आहे. अभिजित कटके (Abhijeet Katke) आणि बाला रफिक शेख (Bala Rafiq) या पेहलवानांमध्ये हा सामना रंगला. या दोघांमधील चुरशीची लढत जालना येथे रंगली. बाला रफिक शेखने अभिजितवर 11-3 अशी मात विजेतेपदाला गवसणी घातली. अभिजित कटके गतवर्षीचा विजेता होता. तर बाळा रफीक शेख याला पहिल्यांदाच 'महाराष्ट्र केसरी' होण्याचा मान मिळाला आहे. बाला रफिक शेख, महाराष्ट्र केसरी कुस्ती 2018 विजेते, पहा 1961-2018 पर्यंत कोण कोण आहेत विजेते

अभिजित कटके विरुद्ध बाला रफिक शेख

22 वर्षीय अभिजित काटके हा  पुण्याचा पेहलवान मॅट विभागात मातब्बर आहे. तो सलग तिसऱ्यांदा मॅट विभागाची फायनल जिंकून महाराष्ट्र केसरी विभागाच्या कुस्तीसाठी पात्र ठरला आहे. तर 26 वर्षीय बाला रफिक हा बुलढाण्याचा पेहलवान असून माती विभागाची फायनल जिंकून पहिल्यांदा महाराष्ट्र केसरीसाठी उतरला होता. महाराष्ट्र केसरी 2018 अंतिम सामना हा मॅटवरच होत असल्याने पारडं अभिजित कटकेच्या बाजूने झुकलेलं असूनही बाळा रफीकने यात बाजी मारली आणि 'महाराष्ट्र केसरी'चा किताब पटकवला.महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2018 अंतिम सामना Live Streaming

महाराष्ट्र केसरी विजेत्या बाला रफिक शेख याला चांदीची गदा आणि 2 लाख रुपयाचं रोख बक्षीस देवून सन्मानित करण्यात आलं.