Maharashtra Kesari Kusti 2018: महाराष्ट्राच्या मातीचा खेळ म्हणजे कुस्ती ! आज जालन्यामध्ये मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. गतवर्षीचा विजेता अभिजित कटके (Abhijeet Katke)आणि बाला रफिक शेख (Bala Rafiq)या पेहलवानांमध्ये हा सामाना रंगणार आहे. महाराष्ट्र केसरी 2018 च्या अंतिम सामन्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) आणि शरद पवार (Sharad Pawar) विशेष उपस्थिती लावणार आहेत. Maharashtra Kesari Kusti 2018: महाराष्ट्र केसरी स्पर्धेदरम्यान गोंधळ, काका पवार तालमीचा स्पर्धेवर बहिष्कार
अभिजित कटके विरुद्ध बाळा रफिक शेख
22 वर्षीय अभिजित काटके हा पेहलवान मॅट विभागात मातब्बर आहे. तो सलग तिसऱ्यांदा मॅट विभागाची फायनल जिंकून महाराष्ट्र केसरी विभागाच्या कुस्तीसाठी पात्र ठरला आहे. तर 26 वर्षीय बाला रफिक हा माती विभागाची फायनल जिंकून पहिल्यांदा महाराष्ट्र केसरीसाठी उतरणार आहे. महाराष्ट्र केसरी 2018 अंतिम सामना हा मॅटवरच होत असल्याने पारडं अभिजित कटकेच्या बाजूने झुकलेले असेल असा त्याच्या चाहत्यांना विश्वास आहे. मात्र दुसरीकडे बाळा रफिकचे चाहते मात्र तितकेच उत्सुक आहेत.
येथे पहा महाराष्ट्र केसरी 2018 लाईव्ह
महाराष्ट्र केसरीच्या विजेत्याला चांदीची गदा आणि २ लाख रुपयाचं रोख बक्षीस मिळणार आहे. त्यामुळे आज जालन्यात रंगणाऱ्या आझाद मैदानावर कुस्ती प्रेमींच्या नजरा खिळल्या आहेत.