अरुण जेटली स्टेडियममध्ये गौतम गंभीर च्या नावाच्या स्टॅन्डचे झाले अनावरण, पाहा Photos
गौतम गंभीर त्याच्या नावाच्या स्टॅन्डच्या अनावरण सोहळ्यात (Photo Credits: Twitter/@GautamGambhir)

अरुण जेटली स्टेडियम (Arun Jaitley Stadium) वर दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने (DDCA) मंगळवारी टीम इंडियाचा माजी सलामी फलंदाज गौतम गंभीर (Gautam Gambhir) याच्या नावावर ठेवण्यात आलेल्या स्टॅन्डचे अनावरण करण्यात आले आहे. गंभीरने आपल्या ट्विटर अकाउंटवर लिहिले की, "अरुण जेटली हे माझे वडीलसामान होते आणि 'अरुण जेटली स्टेडियम' मध्ये माझ्या नावावर स्टॅन्ड असणे ही माझ्यासाठी मोठ्या अभिमानाची बाद आहे. मी अ‍ॅपेक्स कौन्सिल, माझे चाहते, मित्र आणि कुटुंब यांचे आभार मानतो ज्याने प्रत्येक पदावर मला साथ दिली." डीडीसीएच्या अ‍ॅपेक्स कौन्सिलने यावर्षी जूनमध्ये भारतीय संघाचा माजी सलामीवीर गंभीरच्या नावाच्या स्टॅन्डला स्टँडला मान्यता दिली होती. या दिवशी गंभीरने भाजपचे दिवंगत नेते अरुण जेटली यांचेही स्मरण केले. यापूर्वी अरुण जेटली स्टेडियमवर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्या नावावरही विशेष स्टॅन्डचे अनावरण केले होते. ('धोनीमुळे विश्वचषक 2011 च्या अंतिम सामन्यात माझे शतक हुकले'- गौतम गंभीर)

यापूर्वी या स्टेडियमचे नाव फिरोजशाह कोटला स्टेडियम असे होते, परंतु देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटलींच्या निधनानंतर या स्टेडियमचे नाव अरुण जेटली स्टेडियम ठेवण्यात आले. यानंतर, नवीन नावाच्या स्टेडियममध्ये बांगलादेशविरुध्द पहिला टी-20 सामनाही भारताने खेळला. या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला होता. दरम्यान, या स्टेडियममध्ये मोहिंदर अमरनाथ आणि बिशन सिंह बेदी यांच्याही नावावर स्टॅन्ड आहे, तर वीरेंद्र सेहवाग आणि भारतीय महिला संघाची माजी कर्णधार अंजुम चोप्रा यांच्या नावाचे गेट आहे.

गंभीरने आपल्या कारकीर्दीत 58 कसोटी, 147 वनडे सामने आणि 37 टी-20 सामने खेळले आहेत. 2007 वर्ल्ड टी-20 आणि 2011 विश्वचषक जिंकणार्‍या भारतीय संघाचा तो सदस्यही होता. दोन्ही विश्वचषकच्या फायनलमध्ये अर्धशतक झळकावणारा तो भारताचा एकमेव फलंदाज आहे. क्रिकेटम्हून निवृत्ती जाहीर केल्यावर गंभीरने आपली राजकीय खेळी सुरू केली आणि मागील लोकसभा निवडणूक पूर्व दिल्ली येथून भाजपच्या तिकिटावर लढविली, त्यालाही यश मिळाले आणि ते जिंकून संसदेपर्यंत पोहोचले. तथापि, गौतम गंभीरअजूनही क्रिकेटमध्ये सक्रिय आहे आणि अनेकदा कॉमेंट्री करताना दिसतो.