भारतीय संघाचा माजी कर्धणार महेंद्र सिंह धोनी ( Mahendra Singh Dhoni) आणि तडाखेबाज फलंदाज गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यात गेल्या अनेक वर्षापासून वाद सुरु आहे. गौतम गंभीरने अचूक वेळ साधून महेद्र सिंह धोनी याच्यावर सातत्याने आरोप केले आहेत. नुकतीच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत गौतम गंभीर याने महेंद्र सिंह धोनीवर आणखी एक धक्कादायक आरोप केला आहे. एकदिवसीय विश्वचषक 2011 च्या सामन्यात गौतम गंभीरने 97 धावांची खेळी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. दरम्यान, गौतम गंभीर याचे केवळ 3 धावांमुळे शतक हुकले, याला धोनीच जबाबदार आहे, असा आरोप गंभीरने केला आहे. कॅप्टन कूलने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टि-20 विश्वचषक 2007 आणि एकदिवसीय विश्वचषक 2011 वर आपले नाव कोरले होते. दरम्यान, दोन्ही विश्वचषकात भारतीय संघाचा तडाखेबाज खेळाडू गौतम गंभीर याने महत्वाची भुमिका बजावली होती. महत्वाचे म्हणजे, विश्वचषक 2011 मध्ये गौतम गंभीरला केवळ 3 धावांमुळे शतकापासून वंचित राहावे लागले होते. यावर पत्रकारांशी बोलताना गंभीर म्हणाला की, "श्रीलंकेच्या विरुद्धच्या त्या सामन्यात 97 धावा करण्यापूर्वी मी वैयक्तिक शतकाचा विचारही केला नव्हता. माझ्यासमोर श्रीलंकेने ठेवलेले लक्ष्य होते आणि हे मी प्रत्येकाला सांगतो. पण त्या सामन्यात मी आणि धोनी फलंदाजी करत होतो. तेव्हा धोनीने 3 धावा करुन शतक पूर्ण करण्यास सांगितले होते. त्यावेळी धोनीने मला 3 धावांची आठवण करुन दिली नसती तर, मी शतक पूर्ण करु शकलो असतो", असा दावा गौतम गंभीरने केला आहे. हे देखील वाचा- IND vs BAN 1st Test: विराट कोहली याने एम एस धोनी याचा 'हा' रेकॉर्ड काढला मोडीत, बांग्लादेशविरुद्ध पहिल्या सामन्यात बनले 'हे' प्रमुख विक्रम
टी-20 विश्वचषक 2007 च्या अंतिम सामन्यात गौतम गंभीर याने 75 धावांची आक्रमक खेळी होती. परंतु, सामना संपल्यानंतर इरफान पठाण याला समानावीर म्हणून घोषीत केले होते. तसेच एकदिवसीय विश्वचषकात महेंद्र सिंह धोनीने 91 धावांची नाबाद खेळी करुन सामनावीरचा मान पटकावला होता. या सामन्यात धोनीने मारलेला शेवटचा षटकार अजूनही लोकांच्या लक्षात आहे. त्यावेळी धोनीने माझे लक्ष विचलित केले नसते तर, त्यावेळी मी माझे शतक करु शकलो असतो, असा दावा गौतम गंभीरने केला आहे.