महिला प्रीमियर लीग (WPL 2023) ची सुरुवात मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यातील सामन्याने होईल. आज पहिला सामना डीवाय पाटील स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून खेळवला जाईल. लीगच्या पहिल्या सत्रात एकूण पाच संघ सहभागी होत आहेत. या लीगचे सर्व सामने मुंबईत होणार आहेत. मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यातील पहिला सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहे. WPL चा उद्घाटन सामना संध्याकाळी 7:30 (IST) वाजता सुरू होईल. त्याचवेळी, सामन्याचा नाणेफेक अर्धा तास आधी संध्याकाळी 7:00 वाजता (IST) होईल.
WPL च्या पहिल्या सामन्यात कर्णधार म्हणून हरमनप्रीत कौर आणि बेथ मुनी आमनेसामने असतील. हा पहिलाच सामना आहे, त्यामुळे दोन्ही संघांच्या खेळाडूंवर खूप दडपण असेल, जो संघ जिंकेल तो आगामी सामन्यांमध्ये मानसिकदृष्ट्या खंबीर असेल. मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर, जी आज गुजरात जायंट्सविरुद्धच्या डब्ल्यूपीएलच्या सलामीच्या सामन्यासाठी तयारी करत आहे, ती म्हणते की, युवा भारतीय खेळाडूंशी संवाद साधणे आणि त्यांना उच्च-स्तरीय क्रिकेटसाठी त्यांच्या समस्यांवर मात करण्यास मदत करणे हे तिच्या अजेंडावर महत्त्वाचे असेल. (हे देखील वाचा: WPL Start Time Rescheduled: महिला प्रीमियर लीगच्या उद्घाटन सोहळ्याच्या वेळेत बदल, सामना अर्धा तास उशिराने होणार सुरू)
कुठे पाहणार सामना?
Viacom-18 ने महिला प्रीमियर लीगच्या सर्व सामन्यांचे डिजिटल आणि टीव्ही प्रसारण हक्क विकत घेतले आहेत. अशा परिस्थितीत सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण व्हायकॉम-18 च्या स्पोर्ट्स चॅनेल 'स्पोर्ट्स-18 1', 'स्पोर्ट्स-18 1एचडी' आणि 'स्पोर्ट्स-18 खेल' या वाहिन्यांवर केले जाईल. चाहत्यांना Jio Cinema अॅपवर या सामन्यांचे लाइव्ह स्ट्रीमिंगही पाहता येणार आहे.
दोन्ही संघांवर एक नजर
मुंबई इंडियन्स महिला: हरमनप्रीत कौर (कर्णधार), नताली सायव्हर, पूजा वस्त्राकर, यस्तिका भाटिया, अमेलिया केर, अमनजोत कौर, हेली मॅथ्यूज, क्लो ट्रायॉन, हेदर ग्रॅहम, इसाबेल वोंग, प्रियंका बाला, धारा गुजर, हुमैरा काझी, जिंतीमनी कलिमी बिश्त, सायका इशाक, सोनम यादव.
गुजरात जायंट्स महिला: बेथ मुनी (कर्णधार), स्नेह राणा (उपकर्णधार), अॅशले गार्डनर, सोफिया डंकले, अॅनाबेल सदरलँड, हरलीन देओल, किम गर्थ, शब्बिनेनी मेघना, जॉर्जिया वेरेहम, मानसी जोशी, दयालन हेमलता, मोनिका पटेल, तनुजा कंवर , सुषमा वर्मा, हर्ले गाला, अश्विनी कुमारी, पारुनिका सिसोदिया आणि शबनम शकील.