Maharashtra RTE Admissions 2025 ची सुरूवात झाली आहे. student.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईट वर त्यासाठी अर्ज करता येणार आहे. Right to Education अंतर्गत यामध्ये खा जगी शाळेत अर्ज करता येणार आहे. 14 जानेवारीपासून 27 जानेवारी पर्यंत शाळेतील प्रवेशासाठी ही प्रक्रिया सुरू असणार आहे. दरम्यान या उपक्रमाअंतर्गत खाजगी शाळेत सामान्य मुलांना स्वस्त दरात शिक्षण घेण्यासाठी 25% जागा राखीव ठेवल्या जातात. महाराष्ट्रातील 8849 शाळा यासाठी रजिस्टर आहेत. याद्वारा 1,08,61 विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. पुण्यात सर्वाधिक 951 शाळा रजिस्टर आहेत त्यामध्ये यंदा 18,451 सीट्स आहेत.
Maharashtra RTE Admissions साठी कसा कराल अर्ज?
- अधिकृत वेबसाईट student.maharashtra.gov.in ला भेट द्या.
- त्यानंतर सविस्तर वेळापत्रक आणि गाईडलाईन्स वाचा.
- लॉगिन सेक्शन मध्ये जाऊन रजिस्ट्रेशन फॉर्म भरा. त्यामध्ये सारी आवश्यक माहिती सविस्तर भरा.
- त्यानंतर काही आवश्यक कागदपत्रं अपलोड करावी लागणार आहेत.
- पुढे तुम्हांला 5 अंकी verification code टाकावा लागेल. जो स्क्रीन वर दिसेल.
- तुमची माहिती कन्फर्म करून 'Register' बटण दाबा आणि रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करा.
विद्यार्थ्यांनी पूर्व-प्राथमिक वर्गांसाठी आखून दिलेल्या वयोमर्यादेत येणे आवश्यक आहे, विशेषत: 3 आणि 6 वर्षांच्या दरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. समान शैक्षणिक संधींना प्रोत्साहन देण्यासाठी मुलाचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील किंवा इतर वंचित श्रेणीतील असावे. 1 लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुले EWS श्रेणी अंतर्गत अर्ज करण्यास पात्र आहेत.