Los Angeles Fire: अमेरिकेतील रविवारी लॉस एंजेलिस (Los Angeles) परिसरात लागलेल्या वणव्यांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आगीतील मृतांची संख्या 26 वर पोहोचली असून या आगीत (Fire) हजारो घरे उद्ध्वस्त झाली आहेत. चिंताजनक बाब म्हणजे हवामानशास्त्रज्ञांनी या आठवड्यात वारे अधिक तीव्र होतील असा अंदाज वर्तवला आहे, त्यामुळे अग्निशमन दलाच्या पथकांनी आग विझवण्याचे प्रयत्न तीव्र केले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, किमान 16 लोक बेपत्ता आहेत.
हवामान विभागाने जारी केला इशारा -
आगीमुळे राष्ट्रीय हवामान सेवेने इशारा जारी केला आहे. राष्ट्रीय हवामान सेवेने या भागात ताशी 80 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे, तर पर्वतीय भागात ताशी 113 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. हवामानशास्त्रज्ञ रिच थॉम्पसन यांनी सांगितले की, मंगळवारी आग अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. लॉस एंजेलिस काउंटी अग्निशमन प्रमुख अँथनी सी. मॅरोन म्हणाले की, अग्निशमन प्रयत्नांना गती देण्यासाठी 70 अतिरिक्त पाण्याचे ट्रक घटनास्थळी दाखल झाले आहेत. (हेही वाचा -Los Angeles Fire: लॉस एंजेलिसमध्ये वणवा विझवण्यास पाण्याची कमतरता, राज्यपाल संतप्त; आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू)
12 लोक बेपत्ता -
लॉस एंजेलिस काउंटी शेरीफ रॉबर्ट लुना यांनी सागितले की, परिस्थिती भयानक असून ईटन-क्षेत्रातील आगीत 12 लोक बेपत्ता झाल्याची नोंद आहे. पॅलिसेड्समध्ये चार जण बेपत्ता आहेत. आणखी बरेच लोक बेपत्ता असल्याची भीती आहे. आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांपैकी किती जण बेपत्ता असल्याचे वृत्त आहे हे शोधण्याचा प्रयत्न अधिकारी करत आहेत. दरम्यान, मृतांची संख्या 26 वर पोहोचली आहे. (हेही वाचा -Los Angeles Wildfires: अमेरिकेत Nora Fatehi राहत असलेल्या हॉटेलला देखील तातडीने रिकामे करण्याची नोटीस; अभिनेत्रीने सोशल मीडीयात शेअर केली परिस्थिती)
This man saved a bunny from the Los Angeles fire. 🥺 pic.twitter.com/vw1oTiGEzQ
— Tiffany Fong (@TiffanyFong_) January 11, 2025
मृतांची संख्या वाढण्याची शक्यता -
लॉस एंजेलिस काउंटी कोरोनर ऑफिसने एका निवेदनात म्हटले आहे की, पॅलिसेड्स परिसरातील आगीत आठ जणांचा मृत्यू झाला असून ईटन-क्षेत्रातील आगीत 16 जणांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढू शकतो अशी भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. अधिकाऱ्यांनी एक केंद्र स्थापन केले आहे जिथे हरवलेल्या लोकांची माहिती नोंदवता येत आहे.