अभिनेत्री, नृत्यांगणा Nora Fatehi सध्या अमेरिकेत आहे. इंस्टाग्राम वर नोरा फतेहीने लॉस एंजेलिस (Los Angeles) मधील सध्या पेटलेल्या वणंव्याची (Wildfires) स्थिती अतिशय गंभीर असल्याचं म्हटलं आहे. तसेच प्रवासादरम्यानचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. सध्या नोरा राहत असलेलं हॉटेल देखील रिकामे करण्याची सूचना मिळाल्याचं तिने म्हटलं आहे. नोराने अशाप्रकारची स्थिती यापूर्वी कधीही अनुभवली नसल्याचं म्हटलं आहे.
नोरा फतेही आजच अमेरिकेमधून भारतामध्ये परतणार आहे. हॉटेल रिकामं करण्याची सूचना मिळाल्यानंतर तिने आता आपण एअरपोर्ट जवळच्या हॉटेल मध्ये जाणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच या वणव्याच्या पार्श्वभूमीवर आपलं विमान वेळेत अमेरिकेतून निघू देत अशी आशा व्यक्त केली आहे.
नोरा प्रमाणेच अभिनेत्री आणि बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा हीने देखील इंस्टाग्राम वर लॉस एंजेलिस मधील घटनेची माहिती दिली आहे. या भयंकर घटनेमध्ये सारे सुरक्षित राहू देत अशी प्रार्थना तिने व्यक्त केली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करणार्या लोकांना यश मिळू दे अशी अपेक्षा देखील तिने व्यक्त केली आहे. नक्की वाचा: Los Angeles Fire: लॉस एंजेलिसच्या जंगलात नवीन आग; आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू, 1100 इमारती नष्ट, राज्यात आणीबाणी घोषित .
जेमी ली कर्टिस, मँडी मूर आणि पॅरिस हिल्टन यांच्यासह अनेक हॉलीवूड सेलिब्रिटी, लॉस एंजेलिसच्या शेकडो रहिवाशांपैकी आहेत ज्यांनी भयंकर पॅसिफिक पॅलिसेड्सच्या जंगलातील आगीत आपली घरे गमावली आहेत. लॉस एंजेलिसच्या आजूबाजूला वणवा पेटल्याने कलाकारांना तेथून बाहेर पडण्यास भाग पाडले गेले आहे.