Bharat Mobility Global Expo 2025 (Photo Credits: Official Website)

Bharat Mobility Global Expo 2025: यंदा दिल्लीत (Delhi) 17 ते 22 जानेवारी दरम्यान ऑटो एक्सपो-2025 (Auto Expo 2025) होणार आहे. भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो-2025 17 जानेवारीपासून मंडपम, दिल्ली येथे सुरू होईल,  तर ऑटो एक्स्पो 18 तारखेला दिल्लीतील यशोभूमी आणि 19 तारखेला ग्रेटर नोएडा येथील इंडिया एक्स्पो सेंटर आणि मार्ट येथे सुरू होईल. देशातील सर्वात मोठ्या मोटर शोमध्ये 40 हून अधिक नवीन वाहने, उत्पादने लाँच केली जातील. यासोबतच बॅटरी, टायर आणि इलेक्ट्रॉनिक शोचेही आयोजन करण्यात येणार आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे संयुक्त सचिव विमल आनंद यांनी सांगितले की, गेल्या वेळी ऑटो एक्स्पो फक्त दिल्लीच्या मंडपममध्ये आयोजित करण्यात आला होता, परंतु यावेळी तो तिप्पट मोठा असेल. भारत मंडपममध्ये इलेक्ट्रॉनिक शोही होणार आहे.

चीनी कंपन्यांचा सहभाग कमी-

भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये चीनमधून येणाऱ्या लोकांसाठी व्हिसा समस्यांमुळे, चिनी कंपन्यांचा सहभाग कमी असणे अपेक्षित आहे, परंतु BYD सारख्या काही कंपन्या यात सहभागी होतील. एनर्जी स्टोरेज आणि चार्जिंगशी संबंधित कंपन्या 20 हून अधिक नवीन उत्पादने प्रदर्शित करतील. एकूणच, हा एक्स्पो B2B आणि B2C दोन्ही लोकांसाठी असेल. (हेही वाचा: Automobile Sales Grow in India: भारतात 2024 मध्ये किरकोळ ऑटोमोबाईल विक्री 9.1% वाढली)

खास आकर्षण-

'ऑटो शो' हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असेल. भारत मंडपममध्ये बॅटरी शो, टायर शो आणि इलेक्ट्रॉनिक शो यासह मोटर वाहन क्षेत्राशी संबंधित विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल.

‘इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो-2025' चे आयोजन वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने प्रादेशिक उद्योग संस्थांच्या सहकार्याने केले आहे. या एक्स्पोमध्ये केवळ भारतीय वाहन कंपन्याच सहभागी होणार नाहीत, तर अमेरिका, जपान, जर्मनी, इटली, सिंगापूर आणि चीनसह जगभरातील कंपन्या सहभागी होणार आहेत. यामध्ये अनेक कंपन्या आपली भविष्यातील रणनीती जाहीर करतील. गेल्या वर्षी सुमारे 50 प्रदर्शक होते. या वर्षी 80 जणांची पुष्टी झाली आहे. विविध देशांतील साधारण 100 प्रदर्शक अपेक्षित आहेत.