Viral Video | Instagram @News For India

बेंगलूरू मध्ये आईने लग्नात जावई दारू पिऊन आल्याने मुलीचं लग्न मोडल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे. @news.for.india अकाऊंटच्या माहितीनुसार, लग्न विधींमध्ये नवरदेवाने गैरवर्तणूक देखील केल्याचा दावा केला आहे. दरम्यान मुलीच्या आईने हात जोडून स्टेजवरूनच वर्‍हाडींची माफी मागितली आणि त्यांना माघारी जाण्यास सांगितलं. लग्नात सहभागी एक जण आईची समजूत काढताना दिसत आहे. मात्र तरीही तिने लोकांना घरी जाण्यास सांगितले.

वायरल व्हिडीओ मध्ये आई,'आतापासूनच अशी नाटकं आहेत तर भविष्यात माझ्या मुलीसोबत काय होईल?' असं ती बोलताना दिसत आहे. एबीपी न्यूजच्या वृत्तानुसार, वधूच्या कुटुंबासाठी ब्रेकिंग पॉईंट होता जेव्हा मद्यधुंद वराने आरती चं ताट फेकून दिले. नक्की वाचा: लग्नात अतिउत्साही तरूणांवर भडकले भटजी बुवा; फेकून मारली फुलांची थाळी (Watch Video).  

आईने नवरदेव दारू पिऊन आलेला पाहून मोडलं लग्न

 

View this post on Instagram

 

A post shared by News For India (@news.for.india)

सोशल मीडीयात व्हिडिओ वायरल झाल्यानंतर अनेकांनी आईने घेतलेल्या भूमिकेचं कौतुक केले आहे. 'असा निर्णय घ्यायला धाडस लागतं' म्हणत एकाने आईचं कौतुक केले आहे.

सध्या लग्नसराईचा काळ सुरू आहे. लग्न विधींमधील अनेक व्हिडिओज वायरल होत असतात. मात्र हा व्हिडिओ अनेकांना आरसा दाखवणारा आहे. लग्नात विधींना डावलून अनेक चूकीच्या प्रथी मजेच्या नावाखाली सर्रास सुरू असतात.