Hair Loss | (Photo credit: archived, edited, representative image)

Hair Loss Causes and Remedies: केस गळणे (Hair Loss), टक्कल पडणे () या अचानक उद्बवलेल्या आरोग्यविषयक समस्येमुळे बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यातील काही गावे अक्षरश: हादरुन गेली. गावातील गावकऱ्यांच्या डोके आणि शरीरावलील केस अचानक गळू (Hair Loss Causes) लागले. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या जिल्हा आरोग्य विभागाने तातडीने केलेल्या तपासणीत काही प्राथमिक कारणे पुढे आली असली तरी, केंद्र सरकारच्या सर्वोच्च आरोग्य संस्थेने याची गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यामुळे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल सायन्सेस अर्थातच आयसीएमआर (ICMR) एका पथकाद्वारे बुलढाणा येथे दाखल झाली आहे. दिल्ली आणि चेन्नई येथून आलेले हे पथक परिसराचा दौरा करत आहे.

आयसीएमआर करणार टक्कल व्हायरस प्रभावीत गावांची पाहणी

बुलढाणा जिल्ह्यातील केस गळणे आणि टक्कल पडणे या कारणांमुळे चिंतीत असलेल्या 10 ते 12 गावांमध्ये आयसीएमआर चेन्नई आणि दिल्लीचे पथक पाहणी करणार आहे. या पाहणीमध्ये ते नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करतील. त्यांची जीवनशैली, केसगळती होण्यास कारण ठरणारे प्रमुख घटक विचारात घेऊन त्या दृष्टीने शोध घेतील. सांगितले जात आहे की, हे पथक नागरिकांच्या केसांचे नमुनेही गोळा करणार आहे. (हेही वाचा, Why Do Men Go Bald? पुरुषांचे केस का गळतात? त्यांना टक्कल पडण्याची कारणे काय? तज्ज्ञांनी सांगितली कारणे)

फंगल इन्फेक्शन किंवा पाणी ठरले कारण?

जिल्हा आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीमध्ये काही प्राथमिक माहिती पुढे आली असली तरी, केसगळती आणि टक्कल पडणे या समस्येचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. सुरुवातीला फंगल इन्फेक्शन किंवा पाणी हेच समस्येचे प्रमुख कारण असावे, असा आरोग्य अधिकाऱ्यांचा दावा होता. मात्र, नंतर केलेल्या तपासणीत पुढे आले की, या गावातील पाणी प्रचंड प्रदुषीत आहे. ज्यामध्ये नायट्रेट आणि क्षारांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळेच नागरिकांना आरोग्यविषयक समस्या उद्भवल्या असण्याची शक्यता आहे. अरोग्य विभागाने जरी ही कारणे शोधली असली तरी अद्याप स्पष्ट निदान करणे शक्य झाले नाही. परिणामी आयसीएमआरला पाचारण करण्यात आले आहे. (हेही वाचा, Hair Loss in Women: महिलांना टक्कल पडते का? केसगळतीची कारणे आणि कारणीभूत घटक कोणते? घ्या जाणून)

नेमके प्रकरण काय?

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये नागरिकांचे केस आश्चर्यकारकरित्या गळत असल्याचे पुढे आले. प्रसारमाध्यमांतून याबाबत वृत्त प्रसारित झाल्यानंतर एकच खळबळ उलाडी. जिल्हा आरोग्य विभागाने प्राथमिक तपासणी केली. काही नमुने गोळा करुन ते चाचणीसाठीसुद्धा पाठवले. ज्यामध्ये पाण्याच्या नमुन्यात नायट्रेट्स व टीडीएस चे प्रमाण वाढलेला आढळून आले. दरम्यान, नाशिक आणि अहमदाबाद येथे प्रयोगशाळांना पाठविण्यात आलेल्या नमुन्यांचे अहवाल येणे अद्याप बाकी आहे. (हेही वाचा, Buldhana Hair Loss Causes: केस गळती, डोक्याला टक्कल पडण्याचे कारण सापडले; Buldhana Takkal Virus संदर्भात धक्कादायक माहिती)

दरम्यान, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनीही या गावांचा नुकताच दौरा केला होता. या दौऱ्यानंतर आयसीएमआरचे एक पथकही या ठिकाणी दाखल झाले आहे. तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा समावेश असलेले पथक कोणता निष्कर्ष काढते, त्यांना या समस्येचे काय निदान सापडते याबाबत राज्याच्या आरोग्य विभागामध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.