Buldhana Takkal Virus: बुलढाणा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये नागरिकांची होत असलेली केसगळती (Hair Loss Outbreak in Buldhana) आणि टक्कल पडणे (Baldness) या प्रकाराचे कारण आरोग्य विभागाला गवसले (Hair Loss Symptoms and Causes) आहे. ज्यामुळे टक्कल व्हायरस नावाने प्रसिद्ध असलेल्या खळबळजनक घटनेची उकल झाली. जिल्हा आरोग्य विभागाने याबाबत एक अहवाल तयार केला आहे. यासंदर्भात बोलताना जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गिते यांनी सांगितले की, या जिल्ह्यातील गावांमध्ये केस आणि केसांचे आरोग्य यासंबंधी जो काही प्रकार पुढे आला त्याला गाव आणि परिसरातील पाणी कारणीभूत आहे. या गावातील पाणी पिण्यायोग्य आणि वापरण्यायोग्य नाही. असे असताना त्याच पाण्याचा वापर गावकऱ्यांकडून सुरु असल्याने त्याचे दुष्परिणाम पाहायाला मिळत आहेत.
पाण्यामध्ये चक्क 54% नायट्रेट
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांमध्ये केसगळती आणि टक्कल पडणे याचे प्रमाण अधिक असलेल्या गावांमध्ये अम्लयुक्त पाणी अधिक प्रमाणावर आहे. प्रामुख्याने या पाण्यामध्ये नायट्रेट अधिक प्रमाणावर आहे. सर्वसाधारणपणे पाण्यामध्ये असलेले नायट्रेटचे (Nitrate) प्रमाण 10% असणे अपेक्षीत असते. पण परिसरातील पाण्याचे नमुने तपासले असता त्यात तब्बल 54% नायट्रेट आढळून आले. इतकेच नव्हे तर पाण्याची टीडीएस लेव्हलही प्रचंड वाढल आहे. त्यामुळे पाणी विषारी बनले आहे. त्याचाच दुष्परीणाम नागरिकांची केसगळती, टक्कल आणि त्वचारोग होण्यात झाला आहे. दरम्यान, या पाण्यावर अद्यापही संशोधन सुरु आहे. त्यामुळे या पाण्याचे नुमुने आर्सेनिक आणि लीड तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. (हेही वाचा, Hair Loss Outbreak in Maharashtra: भयानक केसगळती, अनेकांना टक्कल, नागरिक हैराण; महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये विचित्र आजार)
पाण्यातील क्षारांचे प्रमाण धक्कादायक
केसगळती, टक्कल प्रभावित गावांमध्ये पाणी केवळ नायट्रेटयुक्त आहे अशातला काहीच भाग नाही. त्याशिवाय त्यात क्षारांचे प्रमाणही प्रचंड आहे. धक्कादायक असे की, सर्वसामान्यपणे पाण्याती क्षारांचे प्रमाण 110 इतके असणे अपेक्षीत असते. पण गावातील पाण्याचे नमुने तपासले असता आरोग्य विभागाचे अधिकारीही चाट पडले. कारण या पाण्यात क्षारांचे प्रमाण तब्बल 2100 इतक्या मोठ्या प्रमाणावर आढळून आले. (हेही वाचा, Hair Loss Symptoms and Causes: केस गळती, टक्कल पडणे; लक्षणे, कारणे आणि वैद्यकीय मदत केव्हा घ्यावी? घ्या जाणून)
टाळूवर खास, केस राठ आणि मग थेट टक्कल
प्रशासनाकडून उपाययोजना सुरु
नायट्रेट आणि क्षारयुक्त पाण्याचे नियमीत सेवन केल्याने गावकऱ्यांना दुष्परीणामांना सामोरे जावे लागत आहे. इतके की, हे पाणी जीवनदायी न ठरता चक्क विष ठरु पाहात आहे. गावकऱ्यांना पीण्याच्या पाण्याची वेगळी सोय करण्यात आली असली तरी, वापरण्याच्या पाण्याबाबत अजूनही वांदे आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना नाईलाजाने हे पाणी वापरण्यासाठी घ्यावे लागत आहे. प्रशासनाने याबाबत तातडीने दखल घेतली असून, उपाययोजना सुरु असल्याचे समजते.