बुलढाणा जिल्ह्यात केसगळती, टक्कल पडत असल्याने नागरिक हैराण | (Photo credit: archived, edited, representative image)

महाराष्ट्रातील बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात येणाऱ्या कळवाड, बोंडगाव आणि हिंगणा गावांतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या गावातील नागरिकामध्ये केसगळती (Hair Loss) होण्याचे प्रमाण अचानक वाढले असून, अनेकांना टक्कल (Baldness) पडले आहे. ज्यामुळे गावातील टक्कल असलेल्या लोकांची लक्षणे (Hair loss - Symptoms and Causes) आणि संख्या कमालीची वाढत असून, अचानक उद्भवलेल्या या भयानक प्रकारामुळे नागरिक हैराण आहेत. अनेकांनी या प्रकाराला टक्कल व्हायरस (Buldhana Baldness Virus) असे नाव दिले आहे तर काहींना वाटते हा गंभीर प्रकार दुषीत पाण्यामुळे (Contaminated Water) होत असावा. जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने या प्रकाराची तातडीने दखल घेतली असून, केसगळती प्रभावीत भागात सर्वेक्षण (Health Survey Buldhana) सुरू केले आहे.

केसगळती होण्यापूर्वी लक्षणे आणि टक्कल पडण्याचे प्रमाण

केसगळतीप्रभावीत भागातील नागरिक या विचित्र प्रकाराबाबत काही महत्त्वाची निरिक्षणे आणि लक्षणे नोंदवतात. या लक्षणांमध्येही विशिष्ट क्रम असून अनेक नागरिकांमध्ये लक्षणांमध्ये साधर्म्य जाणवते. लक्षणांबद्दल बोलताना ग्रामस्थ सांगतात: सुरुवातीचे काही काळ टाळूवर खाज येते. त्यानंतर पुढच्या काहीच दिवसांमध्ये केस अतिशय राठ होतात. त्यानंतर अवघ्या 72 तासांच्या आत टक्कल पडायला सुरुवात होते. धक्कादायक म्हणजे केस इतके कमकूवत होतात की, ते आपोआपच गणळून पडतात. सहज धरुन उपटले तरीही ते हातात येतात. (हेही वाचा, केस गळणे कमी करण्यास मदत करतील हे 5 हेल्दी ज्यूस)

पुरुषच नव्हे तर महिलाही चिंतीत

धक्कादायक म्हणजे या विचीत्र प्रकारची केसगळती केवळ पुरुषांमध्येच नव्हे तर महिलांमध्येही मोठ्या प्रमाणावर आहे. यामध्ये शेकडो पुरुष गावकरी आणि महिलांनाही टक्कल पडले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या विचित्र परिस्थिती निर्माण होण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. स्थानिक पातळीवरील काही डॉक्टरांनी प्राथमिक तपासात अंदाज वर्तवला आहे की, या घटनेचा संबंध विशिष्ट प्रकारचा शाम्पू वापरण्यामध्ये असू शकते. पण, ग्रामस्थ सांगत आहेत की, ज्या लोकांनी आयुष्यात केव्हाही शाम्पू वापरला नाही, अशा लोकांमध्येही या आजाराची लक्षणे दिसू लागली आहेत. त्यांचेही केस गळत आहेत. त्यामुळे हे गूढ आणखीच वाढले आहे. (हेही वाचा, Mira Road: नवऱ्याने टक्कल असल्याचे लपवल्याने नवविवाहित महिलेकडून पोलिसांत तक्रार दाखल; मिरा रोड येथील घटना)

आरोग्य विभागाची कसून तपासणी

केसगळती होऊन नागरिकांना टक्कल पडण्याचा धक्कादायक प्रकार पुढे येताच त्याची आरोग्य विभागाने तातडीने दखळ घेतली आहे. मात्र, स्थानिक राजकीय नेते मात्र, आरोग्य विभागाने या प्रकाराची दखल घेून अधिक कार्यक्षमता न दाखवल्याची टीका केली आहे. नागरिकांकडून जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आले असून त्यात त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे. शेगाव तालुक्यातील शिवसेना नेते रामेश्वर थारकर यांनी बाधित रहिवाशांना मदत करण्यासाठी आणि या संकटाचा सामना करण्यासाठी समर्पित उपचार शिबिराचे आवाहन केले आहे. (हेही वाचा, Hair Lss Reversing Medicine: टक्कल आणि केस गळतीवर 20 रुपयांमध्ये रामबाण औषध? यूपीच्या मेरठमध्ये दोन तरुणांचा दावा, तेल घेण्यासाठी जमली तोबा गर्दी (Video))

प्राथमिक सर्वेक्षणात डझनभर प्रकरणे आढळली

बुलढाणा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने बोंडगाव गावातील केलेल्या सर्वेक्षणात जलद केस गळतीची 30 पुष्टी झालेली प्रकरणे आढळली आहेत. पुढील तपास करण्यासाठी आणि बाधितांना प्राथमिक उपचार देण्यासाठी वैद्यकीय पथके प्रभावित भागात पाठवण्यात आली आहेत.

संभाव्य कारणेः पाण्याचे प्रदूषण किंवा रासायनिक परिणाम?

आरोग्य विभागाचे अधिकारी प्रभावित गावांमधील पाण्याची गुणवत्ता तपासत आहेत. त्यांनी संभाव्य कारणे आणि चाचणीसाठी पाण्याचे नमुने गोळा केले आहेत, दूषितता किंवा पाण्यात अधिक प्रमाणात क्षारांचे प्रमाण असणे हे या केसगळतीस कारण असू शकेर, असा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, चाचणीचा अहवाल आल्यावरच इतर बाबींबाबत तपशालत माहिती मिळू शकणार आहे.

लहान मुले, वृद्ध आणि तरुणांमध्येही टक्कल पडण्याची भीती

शेगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दीपाली बहिर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाधित गावांमध्ये वैद्यकीय अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. ते सर्वेक्षण करत आहेत, आरोग्यविषयक सल्ला देत आहेत आणि आढळलेल्या लक्षणांवर आधारित औषधे देत आहेत. दरम्यान, स्थानिक नेते या संकटाचा सामना करण्यासाठी आणि रहिवाशांचे आरोग्य आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी त्वरित कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

दरम्यान, जिल्हा आरोग्य विभाग केसगळती आणि टक्कल पडण्याचे प्रमाण वाढण्याच्या कारणांचा शोध घेत आहे. तर दुसऱ्या बाजूला गावकरी मात्र आपल्या डोक्यावर केस राहतील की नाही काळजीने भीतीच्या छायेत वावरत आहेत.