Married Woman and Sex: अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्त्री-पुरुष शारीरिक संबंधाबाबत एक महत्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. तीन मुले असलेल्या 30 वर्षीय विधवेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या पुरुषाला जामीन मंजूर करताना, अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले की, लैंगिक संबंधाचा अनुभव असलेली विवाहित स्त्री जर प्रतिकार करत नसेल, तर हे शारीरिक संबंध तिच्या इच्छेविरुद्ध होते असे म्हणता येणार नाही. न्यायमूर्ती संजय कुमार सिंह यांच्या खंडपीठाने सप्टेंबर 2024 मध्ये अटक करण्यात आलेल्या 20 वर्षीय आरोपीला दिलासा देताना हे निरीक्षण केले. ही व्यक्ती सध्या कलम 376, 504 आणि 506 IPC अंतर्गत आरोपपत्राचा सामना करत आहे. एकल न्यायाधीशांनी नमूद केले की, कथित पीडित, सुमारे 9 वर्षे, 7 वर्षे आणि 4 वर्षे वयोगटातील तीन मुलांची आई. अशात ती ज्या कृत्याला संमती देत होती, त्याचे महत्त्व आणि नैतिकता समजून घेण्यास सक्षम होती.
महिलेने आरोपीवर लग्नाच्या बहाण्याने आणि तिच्या मुलांची काळजी घेण्याचे वचन देत, तिच्यासोबत गेल्या दोन वर्षांपासून सतत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप केला होता. पीडितेला अर्जदाराशी लग्न करायचे होते, परंतु अर्जदाराच्या बाजूने नकार दिल्याने त्याला खोटे गोवण्यात आले आहे, असा युक्तिवाद त्याच्या वकिलाने केला. त्यानंतर न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. (हेही वाचा: Sexual Harassment: महिलेच्या शरीराच्या रचनेवर भाष्य करणे लैंगिक छळ मानले जाईल; Kerala High Court चा मोठा निर्णय)
स्त्री-पुरुष शारीरिक संबंधाबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाचे महत्वाचे निरीक्षण-
Physical Relation Not Considered Against Will If Married Woman With Experience In Sex Offers No Resistance: Allahabad HC | @ISparshUpadhyay
Victim, a mother of 3 children, was capable of understanding morality associated with the act : HChttps://t.co/T1eTRO3DGX
— Live Law (@LiveLawIndia) January 14, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)