थायलंड (Thailand) मध्ये कॅबिनेट कडून सोमवारी देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी casinos ला कायदेशीर मंजुरी देण्याचा निर्णय झाला आहे. gambling अर्थात जुगाराचे काही खेळ देखील कायदेशीर करण्यात आले आहे. बॉक्सिंग, घोड्यांच्या शर्यतीवर जुगार यांना परवानगी होती मात्र थायलंड मध्ये कसिनो हा कायदेशीर मान्य खेळ नव्हता. पंतप्रधान Paetongtarn Shinawatra यांनी माहिती देताना याबाबतचा प्रस्ताव आला असून तो मंजूर केल्यास बेकायदेशीर जुगाराला आळा बसेल आणि अनेक गुंतवणूकांना आकर्षित करता येईल असं म्हटलं आहे. भविष्यात त्याचा समाजाला फायदा होईल असं पीएम म्हणाले आहेत.
Draft Law आता संसदेत विचारविनिमयासाठी सादर केला जाईल, जो कायदा पास झाला तर थायलंडच्या कायदेशीर आणि व्यवसायाच्या लँडस्केपमध्ये संभाव्य बदल घडवून आणेल. Thailand Announces e-Visa In India: थायलंडला जाणाऱ्या भारतीयांसाठी आनंदाची बातमी; 1 जानेवारी 2025 पासून भारतात उपलब्ध होणार ई-व्हिसा .
मसुद्यानुसार, आता थायलंड मध्ये 20 वर्षाखालील लोक कसिनोमध्ये प्रवेश करू शकणार नाहीत, जे परदेशींसाठी विनामूल्य खुले असेल, परंतु थाई नागरिकांना 5,000 बाट (USD 148) प्रवेश शुल्क भरावे लागेल. थायलंड मध्ये सप्टेंबर महिन्यापासून सत्तेत आलेल्या नव्या सरकारला आता अर्थव्यवस्थेची घडी बसवणं हे मोठं आव्हान आहे, आता त्याच्या दृष्टीने पावलं उचलण्याच्या प्रक्रियेत सरकारने हा एक मोठा निर्णय घेतला आहे.