Photo Credit- Insta

Sachin Pilgaonkar and Supriya Pilgaonkar: अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर (Supriya Pilgaonkar) यांच्या नावे फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन्ही कलाकारांशी संबंधित मॅनेजर असल्याचे सांगून एकाने काही लोकांची आर्थिक फसवणूक केली. त्याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांनी केले आहे. फसवणूकीची घटना समजताच सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सतर्कता बाळगण्याचे आवाहन करणारी पोस्ट शेअर केली. (Mumbai Crime: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावे लाखोंची फसणूक करणारा अटकेत; उलवे येथून आरोपी मलबार हिल पोलिसांच्या ताब्यात)

ज्यात त्यांनी 'काही लोक सुप्रिया आणि माझ्याशी संबंधित व्यवस्थापकाची तोतयागिरी करत आहेत, कामाच्या संधीच्या बदल्यात पैशाची मागणी करून लोकांना फसवत आहेत.' असे लिहिले आहे. दरम्यान, संबंधीत अशाच दुसऱ्या घटने पोलिसांनी एकाच्या मुसक्या आवळल्या.  काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बनावट स्वक्षरांची कागदपत्रे वापरून लाखोंची फसवणीक करणाऱ्या एकाला मुंबई पोलिसांनी अटक केली होती.

सचिन पिळगावकर यांची इंस्टाग्राम पोस्ट

Photo Credit- Insta

सचिन पिळगावकर यांची पोस्ट

पोस्टमध्ये सचिन पिळगावकर यांनी म्हटले की,'माझ्या निदर्शनास आले आहे की काही लोक सुप्रिया आणि माझ्याशी संबंधित व्यवस्थापकाची तोतयागिरी करत आहेत, कामाच्या संधीच्या बदल्यात पैशाची मागणी करून लोकांना फसवत आहेत. कृपया या फसवणूक करणाऱ्यांपासून सावध रहा. फसवणूक प्रकरणांच्या वाढत्या संख्येमुळे, आम्ही तुम्हाला सतर्क राहण्याचे आवाहन करतो आणि योग्य पडताळणीशिवाय संदेशांवर आंधळेपणाने विश्वास न ठेवता घोटाळ्यांपासून स्वतःचे संरक्षण करा.' अशी पोस्ट त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर केली आहे.