Photo Credit- Pixabay

Mumbai Crime: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar)यांच्या बनावट स्वाक्षरीचे कागदपत्रे (Forged Documents) वापरून अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या एकाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मलबार हिल पोलिसांनी सातारा(Satara) येथील प्रवीण साठे (42) याला अटक केली आहे. साठे याने सरकारी अधिकारी असल्याचे सांगूण स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी लोकांची फसवणूक केली. पुण्यातील व्यापारी अतुल शितोळे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून साठे याला अटक करण्यात आली आहे. साठे याला नवी मुंबईतील उलवे येथून सोमवारी अटक करण्यात आली. (Nashik Mumbai Highway Accident: नाशिक मुंबई हायवे फ्लायओव्हरवर भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू)

 लाखोंची फसणूक करणारा अटकेत

सध्या आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहे. त्यांने आणखी किती जणांना फसवले याचा तपास पोलिस करत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy CM Eknath Shinde) यांच्या नावाखाली बनावट कागदपत्रे असलेल्या अशाच प्रकारच्या फसवणुकीनंतर हे प्रकरण समोर आले असल्याचे मलबार हिल पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.