Puja Khedkar (फोटो सौजन्य - X/@Rajen_Bansal)

महाराष्ट्रामधील निलंबित ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर (Puja Khedkar) ने जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of India) धाव घेतली आहे. तिने दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले आहे ज्यामध्ये जामीन मंजूर करण्यात आला नाही. न्यायालयाने तिला जामीन देण्यास नकार दिला होता. उच्च न्यायालयाने पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना म्हटले होते की, हे फसवणुकीचे मोठे प्रकरण आहे, ज्यामध्ये केवळ घटनात्मक संस्थेचीच नाही तर संपूर्ण समाजाची आणि देशाची फसवणूक झाली आहे. न्यायमूर्ती चंद्र धारी सिंह यांच्या खंडपीठाने म्हटले की, पूजा खेडकरने कट रचून देशाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवला आहे. या प्रकरणाच्या तपासात त्यांचा सहभाग आणि कट असल्याचे स्पष्ट संकेत मिळत असल्याने त्यांना अटकपूर्व जामीन मिळू शकत नाही, असे ते म्हणाले होते.

आता पूजा खेडकरने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बुधवारी 15 जानेवारी रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती बीव्ही नागरथना आणि न्यायमूर्ती सतीश शर्मा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. (हेही वाचा -Puja Khedkar Case: 'पूजा खेडकरचे अपंगत्वाचे दावे खोटे, प्रमाणपत्रात बदलले नाव'; दिल्ली पोलिसांच्या स्टेटस रिपोर्टमध्ये व्यक्त केला संशय).

मागील वर्षी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर या चर्चेत होत्या. 2022 मध्ये झालेल्या UPSC नागरी सेवा परीक्षेत बसण्यासाठी चुकीची माहिती दिल्याचा आरोप तिच्यावर आहे. ज्याच्या जोरावर नागरी सेवा परीक्षेत बसण्याची संधी मिळाली. या प्रकरणाला गती मिळाल्यावर केंद्र सरकारने कारवाई केली. महाराष्ट्र सरकारकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर, U