Makar Sankranti 2025 HD Images 6 (फोटो सौजन्य - File Image)

Makar Sankranti 2025 HD Images: मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti 2025) दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. हा दिवस विशेषतः दान आणि धर्म यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. मकर संक्रांती हा सूर्यदेवाला समर्पित सण आहे. या दिवशी दान केल्याने सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळतो आणि निरोगी आरोग्य लाभते, असं मानलं जातं. महाराष्ट्रात मकर संक्रातीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आज म्हणजेच 14 जानेवारीला देशभरात मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.

याशिवाय, मकर संक्रांती हा सण नवीन वर्षातील पहिला मोठा सण आहे. त्यामुळे हा सण देशाच्या विविध भागात आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी लोक एकमेकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील खालील HD Images, Greetings, Wallpapers, WhatsApp Status द्वारे शेअर करून तुमच्या प्रियजनांना मकर संक्रातीच्या मराठमोळ्या शुभेच्छा देऊ शकता.

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा - 

तीळगूळ घ्या आणि गोड गोड बोला.

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!

Makar Sankranti 2025 HD Images 1 (फोटो सौजन्य - File Image)

तिळात गूळ मिसळा

आणि जिभेवर येऊ द्या गोडवा.

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

Makar Sankranti 2025 HD Images 2 (फोटो सौजन्य - File Image)

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Makar Sankranti 2025 HD Images 3 (फोटो सौजन्य - File Image)

तीळ आणि गुळाप्रमाणे

आयुष्यात गोडवा पसरवूया

मकर संक्रांतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

Makar Sankranti 2025 HD Images 4 (फोटो सौजन्य - File Image)

ही मकर संक्रांत तुमच्या आयुष्यात

भरभराट घेऊन येवो.

मकर संक्रांतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

Makar Sankranti 2025 HD Images 5 (फोटो सौजन्य - File Image)

मकर संक्रांतीला देवांचा दिवस असेही म्हणतात. या दिवसापासून सूर्य उत्तरेकडे सरकू लागतो. शास्त्रांमध्ये उत्तरायणाच्या वेळेला देवांचा दिवस आणि दक्षिणायनला देवांची रात्र म्हटले आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याची पूजा केली जाते. मकर संक्रांती म्हणजे कापणीच्या हंगामाची सुरुवात आणि सूर्याचे मकर राशीत संक्रमण. मकर संक्रांतीनंतर दिवस मोठा होऊ लागतो. वर्षभरात येणाऱ्या बारा संक्रांतींपैकी ही संक्रांती सर्वात महत्त्वाची मानली जाते.