 
                                                                 Makar Sankranti 2025: देशभरात मकर संक्रांतीचा उत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे. अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि परेश रावल (Paresh Rawal) यांनी 'भूत बांगला' चित्रपटाच्या सेटवर पतंग उडवत मकर संक्रांत साजरी (Makar Sankranti 2025) केला. 'भूत बांगला'हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. 2026 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. 'भूत बांगला' (Bhooth Bangla)चित्रपटाच्या सेटवर निरभ्र आकाशात दोघे पतंग उडवतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. (Bhooth Bangla Movie: अक्षय कुमारचा 'भूत बांगला' हिट होणार हे निश्चित, तब्बू असेल कारण)
याआधी हेरा फेरी आणि भूल भुलैया सारख्या हीट कॉमेडी चित्रपटांमध्ये दोघे दिसले होते. 'भूत बांगला'नंतर ते फिर हेराफेरी 3मध्ये एकत्र दिसणार आहे. अक्षर कुमारने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ शेअर केला. @pareshrawalofficial सोबत #BhoothBangla च्या सेटवर मकर संक्रांतीचा उत्साह साजरा करत आहे! हास्य, चांगले वातावरण आणि पतंगासारखे नेहमी उंच उडत राहवे. पोंगल, उत्तरायण आणि बिहूच्या शुभेच्छा.” अशी पोस्ट लिहित त्याने चाहत्यांना शुभेच्छा दिल्या.
View this post on Instagram
त्याच्या या पोस्टवर अनेकांनी तमेंट केल्या आहेत. एका वापरकर्त्याने कमेंट केली, "बाबू भैया आणि राजू एकाच विश्वात." “राजू आणि बाबुराव एकत्र,” असे दुसऱ्या चाहत्याने म्हटले. "तुम्हा दोघांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहे," एका चाहत्याने कमेंट केली. एका म्हटले की, "भूत बांगला हा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर लोडिंग आहे."
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
