Adam Gilchrist on Shubman Gill: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील (Border-Gavaskar Trophy) खराब कामगिरीनंतर भारतीय खेळाडूंना सर्वच दिग्गज खेळाडूंकडून टीकेला सामोर जाव लागत आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी विकेटकीपर-फलंदाज अॅडम गिलख्रिस्टने (Adam Gilchrist) तर भारताच्या स्टार खेळाडूला त्याच्या केसांवरून सुनावले (Adam Gilchrist Shubman Gill)आहे. 'हेअरस्टाईलवर लक्ष देण्याऐवजी फलंदाजीवर लक्ष दे' असे त्याला सुनावले आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून शुभमन गील आहे. त्यासोबतच खेळावर लक्ष केंद्रीत कर असा सल्ला दिला आहे. (Nitish Kumar Reddy: नितीश कुमार रेड्डीने गुडघ्यांवर चढल्या तिरुपती मंदिराच्या पायऱ्या; बॉर्डर गावस्कर मालिकेत दरमदार कामगिरीनंतर तिर्थस्थळी भेट (Watch Video))
हेअरस्टाईल पेक्षा मोठ्या धावा करण्यावर लक्ष हवे
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये युवा फलंदाज शुभमन गिलला बॅटने मोठा संघर्ष करावा लागला. 'गिलने त्याच्या हेअरस्टाईलने लक्ष वेधण्यापेक्षा मोठ्या धावा करण्यावर लक्ष केंद्रित करावे असे गिलख्रिस्टने म्हटलेन दिले. गिलचे केस शतके ठोकल्यानंतर आणि त्याचे हेल्मेट काढल्यानंतरच प्रभावी दिसतात,' असे म्हणत त्याची खिल्ली उडवली. शुभमन गिल पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये एकूण 93 धावा केल्या. ज्याची सरासरी 18.60 होती. त्याच्या कामगिरीवर विचार करताना गिलख्रिस्टने ही टिप्पणी केली.
10 पैकी चार गुण- ॲडम गिलख्रिस्ट
ॲडम गिलख्रिस्टने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये शुभमन गिलच्या कामगिरीवर रेटींग देताना म्हटले की, 'मला त्याला 10 पैकी तीन गुण द्यायचे होते. पण मी त्याला चार गुण देईन. कारण, हेल्मेट काढल्यानंतर कोणताही क्रिकेटपटू चांगला दिसत नाही असे मला वाटत होते. मात्र, गीलला त्याच्या केसांपेक्षा त्याच्या फलंदाजीवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. गिलला भारताचे भविष्य मानले जाते. भारताच्या शेवटच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तो संघासोबत होता आणि त्याने शानदार फलंदाजी केली होती.”
10 पैकी चार गुण- मायकल वॉन
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉननेही गिलच्या खराब कामगिरीवर निराशा साधला. वॉनने म्हटले की, “मी त्याला 10 पैकी 4 गुण देईन. तो एक चांगल्या फलंदाजांपैकी एक आहे आणि त्याची फलंदाजी खूप सुंदर आहे. मात्र, त्याने सर्वांना नाराज केले. त्याला मोठी धावसंख्या उभारावी लागेल. (New Guidelines For Team India Players: ऑस्ट्रेलियातील पराभवानंतर BCCI ने घेतली कठोर भूमिका; खेळाडूंसाठी नवे नियम लागू, क्रिकेटपटूंच्या पत्नींचा दौऱ्यातील कालावधी झाला कमी)
दुसरीकडे गिलख्रिस्ट आणि वॉन दोघांनीही मालिकेतील रवींद्र जडेजाच्या योगदानाचे कौतुक केले. गिलख्रिस्टने जडेजाचे 'चांगला] असे वर्णन करत त्याला 7.5 किंवा 8/10 गुण दिले. तर वॉनने जडेडाचे कौतुक करताना म्हटले की, 'तो एक हुशार क्रिकेटपटू आहे. तो नेहमीच चांगले योगदान देतो.' जडेजाने भारताच्या कामगिरीत महत्त्वाची भूमिका बजावली, त्याने पाच डावात 135 धावा केल्या. ज्यामध्ये एक महत्त्वाचा अर्धशतकही होता. ब्रिस्बेनमध्ये त्याने केलेल्या 77 धावांमुळे भारताला फॉलोऑन टाळता आला. तर त्याच्या गोलंदाजीमुळे त्याने चौथ्या कसोटीत चार बळी घेतले.